WTC 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथला सतावतेय अशी भीती, स्पष्टच सांगितलं की..

WTC Final 2023 At Oval : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. दोन वर्षांच्या कसोटीनंतर दोन संघाची अंतिम फेरीत वर्णी लागली आहे. पण तत्पूर्वी ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टिव्ह स्मिथने एक भीती व्यक्त केली आहे.

WTC 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथला सतावतेय अशी भीती, स्पष्टच सांगितलं की..
WTC 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथने वर्तवलं असं भाकीत, म्हणाला...
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 3:21 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानात रंगणार आहे. हा सामना 7 जून ते 11 जून 2023 पर्यंत असणार आहे. या सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज असून जोरदार सराव सुरु आहे. पण या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथने खेळपट्टीबाबत भाकीत वर्तवलं आहे. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. पण इतकंच नाही खेळ जसजसा पुढे जाईल तसा भारतासारख्या स्थितीचा सामना करावा लागून शकतो अशी भीती देखील त्याने व्यक्त केली आहे.

काय सांगितलं स्टिव्ह स्मिथने

ओव्हल मैदानातील खेळपट्टी वेगवान आणि बाउंसला साथ देणारी आहे. ही स्थिती फलंदाजांसाठी चांगली आहे. भारत अशा स्थितीचा फायदा घेण्यासाठी संघात स्टार फिरकीपटून रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांना प्लेइंग 11 मध्ये सहभागी करू शकते. “ओव्हलमध्ये जसा जसा खेळ पुढे जाईल, तसं फिरकीपटूना मदत मिळू शकते. त्यामुळे आम्हाला या सामन्यात भारतासारख्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो.”, असं स्टीव्ह स्मिथने सांगितलं.

“ओव्हल मैदानाची आउटफील्ड वेगवान आहे. फलंदाजीसाठी चांगली आहे. इंग्लंडच्या इतर खेळपट्टीप्रमाणे यात वेग आणि बाउंस आहे.”, असंही स्टीव्ह स्मिथने पुढे सांगितलं.

ऑस्ट्रेलियन संघ नुकताच भारत दौऱ्यावर चार कसोटी सामने खेळण्यासाठी आला होता. ही मालिका भारताने 2-1 ने जिंकली आहे. या मालिकेत फिरकीपटूंना आपल्या गोलंदाजीने कमाल केली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंची चांगलीच दमछाक झाली होती. त्यामुळे अंतिम सामन्यात कोणतीच उणीव ठेवणार नसल्याचं दिसत आहे.

दोन्ही संघांची संपूर्ण स्क्वॉड

WTC Final साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार.

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.