WTC 2023 Final : मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर जोरदार अपील, रोहित शर्माने डीआरएसची केली अशी अपील की…

दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना विकेट घेणं महत्त्वाचं आहे. यासाठी पहिल्या षटकापासून गोलंदाज प्रयत्न करत होते. पण एक वेळ अशी आली की डीआरएस घेताना रोहितची अॅक्शन पंचांना संभ्रमात टाकून गेली.

WTC 2023 Final : मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर जोरदार अपील, रोहित शर्माने डीआरएसची केली अशी अपील की...
WTC 2023 Final : रोहित शर्माच्या डीआरएस अपीलमुळे पंच झाले आवाक्, नेमकं काय केलं पाहा
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 4:46 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवलं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कमबॅक करण्याचं मोठं आव्हान भारतीय गोलंदाजासमोर होतं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियन संघ 3 बाद 327 धावांवर खेळत होता. त्यामुळे कमबॅकसाठी भारताला विकेटची गरज होती. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात मोहम्मद सिराजने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. 163 धावा करणाऱ्या ट्रेव्हिस हेडला तंबूत पाठवलं. त्यानंतर मोहम्मद शमीने कॅमरून ग्रीनला बाद करत संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र एका बाजूने स्मिथ किल्ला लढवत होता. त्यामुळे विकेट घेणं गरजेचं होतं. यासाठी गोलंदाज प्रयत्न करत होते. कर्णधार रोहित शर्माही एकही अपील सोडत नव्हता. वारंवार डीआरएस घेण्याबाबत विकेटकीपर आणि गोलंदाजाशी चर्चा करत होता.

मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर अलेक्स कॅरे फलंदाजी करत होता. शमीची गोलंदाजी खेळताना त्याला त्रास होत होता. शमीही त्याला बाद करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत होता. षटकाच्या पाचव्या चेंडूवर जोरदार अपील केली. त्यानंतर रोहित शर्मा तिथे धावत आला आणि अपील बाबत चर्चा केली. पण डीआरएस घेतला नाही.

षटकाच्या सहाव्या चेंडूवरही तशीच जोरदार अपील करण्यात आली. चेंडू कॅरेच्या पॅडवर आदळल्याबरोबर जोरदार अपील झाली. डीआरएसची वेळ संपेपर्यंत रोहित शर्माने शमी आणि विकेटकीपर श्रीकर भरतसोबत चर्चा केली. एक क्षण असं वाटलं की डीआरएस घेणार नाही. पण रोहित शर्माने वेगळीच अॅक्शन करत पंचांना कन्फ्यूज केलं. हात तसाच ठेवला पण टेकवला नाही. त्यामुळे पंचही संभ्रमात पडले. डीआरएस घेतला नसल्याचं त्यानंतर स्पष्ट झालं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.