WTC 2025 Final : डेविड बेडिंघमच्या पुढे एलेक्स कॅरीची चाल गेली फेल, कर्णधार कमिन्सलाही आलं हसू
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 74 धावांची आघाडी घेतली. दक्षिण अफ्रिकेला फक्त 138 धावा करता आल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी डेविड बेडिंघम डोकेदुखी ठरत होता. त्याला बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या एलेक्स कॅरीने असं डोकं लावलं होतं. पण बाद काही करू शकला नाही.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सरशी घेतली आहे. 74 धावांची मजबूत आघाडी मिळाल्याने दक्षिण अफ्रिकन संघ बॅकफूटवर गेला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 212 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेचा संघ 138 धावांवरच गारद झाला. पण मधल्या फळीत कर्णधार टेम्बा वाबुमा आणि डेविड बेडिंघम यांनी ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढवली होती. त्यात बेडिंघमची खेळी पाहता त्याला बाद करणं आवश्यक होते. यासाठी ऑस्ट्रेलियन गोलंदाज शर्थीचे प्रयत्न करत होते. या दरम्यान एक विचित्र प्रकार घडला. ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर एलेक्स कॅरीने बेडिंघमला बाद करण्यासाठी डोकं लावलं. पण त्याच्या हेतूवर पहिल्यांदा दक्षिण अफ्रिकेन बेडिंघमने आणि पंचांनी पाणी टाकलं. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.
बेडिंघम 31 धावांवर खेळत होता आणि सेट झाल्याने ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढली होती. ऑस्ट्रेलियन गोलंदाज त्याची विकेट काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत होते. डावाच्या 49व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बेडिंघमच्या पायावर चेंडू आदळला आणि पॅडमध्ये फसला. चेंडू पॅडमध्ये अडकल्याचं पाहून विकेटकीपर एलेक्स कॅरीने चेंडू पकडण्यासाठी वेगाने उडी मारली. पण त्याचं चाल आधीच बेडिंघमच्या लक्षात आली होती. त्याने लगेच चेंडू काढून जमिनीवर आदळला. एलेक्स कॅरेला यात काही यश आलं नाही.
A humorous moment unfolds between Alex Carey and David Bedingham at Lord’s😅 pic.twitter.com/3aYVFwanY4
— Root Jaiswal (@JaiswalRoot) June 12, 2025
दुसरीकडे, स्लिपला उभ्या असलेल्या उस्मान ख्वाजाने बेडिंघमने चेंडू हाताने पकडल्याने जोरदार अपील केली. पण पंचांनी ही अपील धुडकावून लावली. पंचांच्या मते तेव्हा चेंडू डेड झाला होता, जेव्हा पॅडमध्ये अडकला होता. हा सर्व प्रकार पाहून कर्णधार पॅट कमिन्स हसू आवरलं नाही. दरम्यान, बेडिंघमचा खेळ काही फार काळ टिकू शकला नाही. त्यला बाद करण्यात पॅट कमिन्सला यश आलं. एलेक्स कॅरेने विकेटमागे त्याचा अप्रतिम झेल पकडला. बेडिंघमने 111 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 45 धावा केल्या. बेडिंघम बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला पुढच्या विकेट घेणं अधिक सोपं झालं. पुढच्या तीन धावातच आणखी दोन विकेट पडल्या आणि डाव 138 धावांवर आटोपला.
