AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2025 : अंतिम फेरीसाठी टीम इंडियासह हे पाच संघ शर्यतीत, जाणून कोणाला किती संधी ते

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या साखळी फेरीचे सामने आता अंतिम टप्प्यात आहेत. प्रत्येक संघाच्या एखाद दोन मालिका शिल्लक आहेत. त्यामुळे संघांमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. या शर्यतीत एकूण पाच संघ असून कोणाला किती संधी ते जाणून घ्या

WTC 2025 : अंतिम फेरीसाठी टीम इंडियासह हे पाच संघ शर्यतीत, जाणून कोणाला किती संधी ते
| Updated on: Oct 03, 2024 | 10:34 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं तिसरं पर्व सुरु आहे. पहिल्या पर्वात न्यूझीलंडने आणि दुसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. भारताच्या पदरी दोन्ही पर्वात अपयश पडलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना लॉर्ड मैदानावर होणार आहे. हा सामना 7 जून ते 11 जून दरम्यान होणार आहे.भारतीय संघ तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. पण एखादं गणित चुकलं तर सर्व काही बिघडू शकतो. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत टॉपला आहे. तर ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. असं असलं तरी श्रीलंका, दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड संघ शर्यतीत आहेत. म्हणजेच आता नऊ पैकी पाच संघांना संधी आहे. तर पाकिस्तान, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि बांग्लादेश हे संघ शर्यतीत बाद झाले आहेत. चला जाणून घेऊयात कोणत्या संघाला किती संधी ते

भारत : टीम इंडियाचे दोन मालिका शिल्लक असून 8 सामने खेळणार आहे. भारताने न्यूझीलंडला 3-0 ने पराभूत केलं आणि ऑस्ट्रेलियाकडून 3-1 पराभव झाला तरी 65.78 विजय टक्केवारीसह अंतिम फेरी गाठू शकते. दुसरीकडे, भारताने न्यूझीलंडला क्लीन स्वीप दिला. पण ऑस्ट्रेलियाने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला क्लीन स्वीप दिला, तर विजयी टक्केवारी 58.77% पर्यंत घसरेल. अशा परिस्थितीत श्रीलंकेसाठी अंतिम फेरीत प्रवेश करण्याचे दरवाजे खुले होतील.

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाने भारताविरूद्धची मलिका 2-2 बरोबरीत सोडवली आणि श्रीलंकेत 2-0 ने विजय मिळवल्यास विजयी टक्केवारी 62.28 होईल. अशा स्थितीत अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. पण मालिका भारताविरुद्ध 2-2 ड्रॉ आणि श्रीलंकेविरुद्ध 1-1 ड्रा झाली तर विजयी टक्केवारी 57 होईल. यामुळे श्रीलंकेसह दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंडलाही संधी मिळेल.

श्रीलंका : श्रीलंकेचा दक्षिण आफ्रिकेकडून 0-2 पराभव झाला, तर अंतिम फेरीची संधी संपुष्टात येईल. ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश करूनही विजयी टक्केवारी 53.84 पर्यंत जाईल. त्यामुळे स्पर्धेतून बाद होईल.

दक्षिण अफ्रिका : दक्षिण अफ्रिकेचे एकूण सहा सामने शिल्लक आहेत. सहापैकी पाच सामन्यात विजय मिळवला तर विजयी टक्केवारी 61.1 टक्के होईल. त्यामुळे अंतिम फेरीची संधी मिळू शकते. पण चार सामन्यातच विजय मिळवला तर विजयी टक्केवारी 52.77 टक्के होईल. अशा स्थितीत इतर संघाच्या कामगिरीकडे लक्ष असेल.

न्यूझीलंड : न्यूझीलंडने उर्वरित सहा सामन्यात विजय मिळवला तर विजयी टक्केवारी 64.29 होईल. पण एक जरी सामना गमवला तर विजयी टक्केवारी 57.14 टक्के होईल. जर भारतात 1-1 सामना ड्रॉ झाला आणि इंग्लंडला 3-0 ने पराभूत केलं तरी न्यूझीलंडला गाशा गुंडाळावा लागेल.

Follow Us
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... अचानक दिलेल्या आदेशांमुळे राष्ट्रवादीत खळबळ
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! भाविकाकडुन कोट्यवधींच दान
Pandharpur | विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! अज्ञात भाविकाकडुन कोट्यवधींचं दान
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
Sonam Wangchuk : 9 किलो वजन घटलं, सोनम वांगचुक यांची प्रकृती चिंताजनक; डॉक्टरांनी दिला मोठा इशारा.

Sonam Wangchuk : 9 किलो वजन घटलं, सोनम वांगचुक यांची प्रकृती चिंताजनक; डॉक्टरांनी दिला मोठा इशारा

Gold Rate Today : वीकेंड जवळ येतानाच गोल्डन न्यूज, सोन्याचे भाव चांगलेच घसरले;  खरेदीआधी टाका किमतींवर नजर.

Gold Rate Today : वीकेंड जवळ येतानाच गोल्डन न्यूज, सोन्याचे भाव चांगलेच घसरले; खरेदीआधी टाका किमतींवर नजर

मुंबईत घर खरेदी महागणार? नोंदणी शुल्काविषयी मोठी अपडेट, अशी बसणार सर्वसामान्यांच्या खिशाला झळ.

मुंबईत घर खरेदी महागणार? नोंदणी शुल्काविषयी मोठी अपडेट, अशी बसणार सर्वसामान्यांच्या खिशाला झळ

अक्षय कुमार इमोशनली डिस्टर्ब..; 25 कोटींच्या नोटिशीवर परेश रावल यांनी सोडलं मौन.

अक्षय कुमार इमोशनली डिस्टर्ब..; 25 कोटींच्या नोटिशीवर परेश रावल यांनी सोडलं मौन

IND vs ENG: टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळलं, मॅच जिंकताच हॅरी ब्रूकने माज दाखवला, भारतीय संघाबद्दल नको ते बोलला.

IND vs ENG: टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळलं, मॅच जिंकताच हॅरी ब्रूकने माज दाखवला, भारतीय संघाबद्दल नको ते बोलला

IND vs ENG : दुसरी मॅच तर हरलो पण त्यापेक्षा वाईट म्हणजे पहिली वनडे जिंकवून देणारा स्टार खेळाडू सीरीजमधून OUT.

IND vs ENG : दुसरी मॅच तर हरलो पण त्यापेक्षा वाईट म्हणजे पहिली वनडे जिंकवून देणारा स्टार खेळाडू सीरीजमधून OUT