AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2025 : भारताचं अंतिम फेरीचं गणित पराभवामुळे बिघडलं, किती सामन्यात विजय आवश्यक? जाणून घ्या

भारत न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला धक्का बसला आहे. न्यूझीलंडने 8 गडी राखून टीम इंडियाचा पराभव केला आहे. यामुळे भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित किचकट झालं आहे. आता किती सामने जिंकावे लागणार ते जाणून घ्या

WTC 2025 : भारताचं अंतिम फेरीचं गणित पराभवामुळे बिघडलं, किती सामन्यात विजय आवश्यक? जाणून घ्या
Image Credit source: BCCI
| Updated on: Oct 20, 2024 | 2:16 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना जूनमध्ये होणार आहे. त्यामुळे अंतिम फेरीत स्थान गुणतालिकेत टॉप 2 स्थानी राहणं आवश्यक आहे . सध्या गुणतालिकेत टीम इंडिया अव्वल स्थानी आहे. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पराभवाचं तोंड पाहावं लागल्याने पुढचं गणित किचकट झालं आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 विकेट राखून धुव्वा उडवला. खरं तर ही मालिका 3-0 ने जिंकण्याची गरज होती. मात्र पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिल्याने पुढे कठीण परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताची विजयी टक्केवारीत घट झाली आहे. या सामन्यापूर्वी भारताची विजयी टक्केवारी ही 74.24 इतकी होती. मात्र पराभव होताच ही टक्केवारी 68.06 वर येऊन पोहोचली आहे. भारतीय संघ अजूनही गुणतालिकेत अव्वल स्थानी असून अंतिम सामन्याचा प्रबळ दावेदार आहे. भारताने कसोटी चक्रात 12 सामने खेळले आहेत. त्यात 8 सामन्यात विजय, तीन सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. अजूनही भारताला सात खेळायचे शिल्लक आहेत. त्यामुळे पुढचं गणित कसं असेल याबाबत जाणून घ्या.

न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतील दोन सामने शिल्लक आहेत. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. सात पैकी किती सामने जिंकले तर अंतिम फेरीचं स्थान पक्कं होईल. भारताला आता अंतिम फेरी गाठण्यासाठी सात पैकी चार सामने काहीही करून जिंकावे लागणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध दोन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सामने जिंकावे लागणार आहेत. भारताने चार सामने जिंकले तर विजयी टक्केवारी 64.03 इतकी होईल आणि अंतिम फेरीचं गणित सुटेल. भारताने 7 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला तर अंतिम फेरीतील स्थान पक्कं होईल.

भारताने दोन वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जागा मिळवली आहे. पहिल्या पर्वात न्यूझीलंडकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यानंतर दुसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाची धूळ चाखावी लागली होती. आता भारतीय संघ तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठणार का? याची उत्सुकता आहे. भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होणार का? याबाबतही उत्सुकता आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी