AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final 2023 : मोठ्या मनाचा अश्विन, टीमने बाहेर बसवलं, पण त्याच्या एक कृतीने तो झाला हिरो, फोटो व्हायरल

बॉर्डर-गावसकर मालिकेमध्ये अश्विनने चमकदारा कामगिरी केली होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अश्विन कांगारूंना येडपिसं करून सोडतो. त्यामुळे अतिमहत्त्वाच्या सामन्यात या हुकमी खेळाडूला बाहेर बसवणं चाहत्यांना काही पचनी पडत नाहीये. अशातच अश्विनच्या एका फोटोने सर्वांची मन जिंकली आहेत.

WTC Final 2023 : मोठ्या मनाचा अश्विन, टीमने बाहेर बसवलं, पण त्याच्या एक कृतीने तो झाला हिरो, फोटो व्हायरल
| Updated on: Jun 08, 2023 | 1:36 AM
Share

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या फायनल 2023 सामन्यात आर. अश्विनला प्लेइंग 11 मध्ये न घेतल्याने क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा होताना दिसत आहे. मॅचविनर खेळाडूला टीम इंडियाच्या मॅनेटमेंटने बाहेर बसवण्याचा निर्णय कसा घेतला? अश्विनने एकट्याच्या दमावर कित्येक मॅच टीम इंडियाला जिंकून दिल्या आहेत. बॉर्डर-गावसकर मालिकेमध्ये अश्विनने चमकदारा कामगिरी केली होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अश्विन कांगारूंना येडपिसं करून सोडतो. त्यामुळे अतिमहत्त्वाच्या सामन्यात या हुकमी खेळाडूला बाहेर बसवणं चाहत्यांना काही पचनी पडत नाहीये.

अश्विनची कसोटीमधील कामगिरी पाहिली तर टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीमध्ये तो दुसऱ्या स्थानी आहे. अश्विनने आतापर्यंत 92 सामन्यांमधील 174 डावात त्याने 474 विकेट्स घेतल्या आहेत.  इतक्या मोठ्या खेळाडूला टीम मॅनेजमेंटने बसवण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं गेलं. या भि़ड़ूचे रेकॉर्ड जसे मोठे आहेत त्याप्रकारे त्याचं मनही तितकं मोठं आहे.

आजच्या सामन्यात याची एक झलक दिसून आली, एखाद्या खेळाडूला वाटलं असतं की आपण इतके मोठे रचलेले असतानाही आपल्याला संघात स्थान दिलं नाही. समोर उघडपणे दाखवलं नसलं तरी मनात ती खंत राहतेच. मात्र अश्विन थोडा वेगळा आहे.

टीम इंडियासाठी सगळ्यात जास्त विकेट घेणारा खेळाडू ड्रिंक्स ब्रेकवेळी नवख्या खेळाडूसारखा पाण्याच्या बॉटल्स घेऊन आलेला दिसला. अश्विन आला त्यावेळी तो रोहित शर्माला काही सल्ले देताना दिसला. आजच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मालाही अश्विनही कमी जाणवली असावी. ट्राविस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांना काही यश मिळवून दिलं नाही.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन्ही टीम

WTC Final साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.