WTC Final : टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणारच, फक्त आश्विनला करावी लागेल ही कामगिरी

भारतीय संघाने बॉर्डर गावसकर मालिका खिशात घालत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या सामन्याकडे क्रीडा रसिकांचं लक्ष लागलं आहे. या सामन्यामध्ये भारताचा फिरकीपटू आर. आश्विनलाही मोठा विक्रम करण्याची संधी असणार आहे.

WTC Final : टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणारच, फक्त आश्विनला करावी लागेल ही कामगिरी
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 8:00 PM

मुंबई : भारतीय संघाने बॉर्डर गावसकर मालिका खिशात घालत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर 7 जूनला फायनल सामना होणार आहे. या सामन्याकडे क्रीडा रसिकांचं लक्ष लागलं आहे. या सामन्यामध्ये भारताचा फिरकीपटू आर. आश्विनलाही मोठा विक्रम करण्याची संधी असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीमध्ये आश्विन मागे असून दुसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा आहे.

आश्विनने आतापर्यंत 13 सामन्यांमधील 26 डावांत 61 विकेट्स घेतल्या असून तो तिसऱ्या स्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या आफ्रिकेच्या कगिसो रबाडाने 13 सामन्यांमधील 22 डावात 67 विकेट्स मिळवल्या आहेत.

या यादीत ऑस्ट्रेलियाचा नाथन लायन हा 19 सामन्यांमधील 32 डावात 83 विकेट्ससह पहिल्या स्थानावर आहे. लायन याने एका सामन्यामधील दोन्ही डावांमध्ये मिळून 15 विकेट्स घेतल्या होत्या. चौथ्या स्थानावर ऑली रॉबिन्सन 13 सामन्यांत 53 विकेट्स तर पॅट कमिन्स 15 सामन्यांमध्ये 53 विकेट्स सह पाचव्या स्थानी आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीमध्ये दुखपतीमुळे बाहेर असलेला जसप्रीत बुमराह आहे. आश्विननंतर दुसऱ्या क्रमांकावर 10 सामन्यांमध्ये 45 विकेट्स घेणारा जसप्रीत बुमराह आहे. तिसऱ्या स्थानी रवींद्र जडेजा असून त्याने 12 सामन्यांमध्ये 41 बळी घेतले आहेत.

त्यापाठोपाठ मोहम्मद शमीने 41 विकेट्स तर मोहम्मद सिराज याने 13 सामन्यात 31 विकेट्स, अक्षर पटेल याने 9 सामन्यांत 23 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे आश्विनने जर करिष्मा दाखवला आणि पहिल्या क्रमांकावर उडी घेतली तर भारत फायनलमध्ये विजय मिळवू शकतो.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.