AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final SA vs AUS : ऑस्ट्रेलियाचा डाव पहिल्याच दिवशी 212 धावांवर आटोपला, रबाडाचा सुपर ‘पंच’

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होत आहे. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याने ऑस्ट्रेलियाचं कंबरडं मोडलं. तसेच ऑस्ट्रेलियाला 212 धावांवर रोखलं.

WTC Final SA vs AUS : ऑस्ट्रेलियाचा डाव पहिल्याच दिवशी 212 धावांवर आटोपला, रबाडाचा सुपर 'पंच'
ऑस्ट्रेलियाचा डाव पहिल्याच दिवशी 212 धावांवर आटोपलाImage Credit source: ICC Twitter
| Updated on: Jun 11, 2025 | 8:55 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा पहिला दिवस दक्षिण अफ्रिकेच्या नावावर राहिला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला असंच म्हणावं लागेल. कारण दक्षिण अफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज चीतपट झाले. स्टीव्हन स्मिथ आणि वेबस्टर वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी 56.4 षटकांचा सामना केला आणि 212 धावांवर खेळ आटोपला. या सामन्यात कगिसो रबाडाने ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत पाठवला. 15.4 षटकात 5 षटक निर्धाव टाकली आणि 51 धावा देत 5 जणांना तंबूत पाठवलं. यात आघाडीचा फलंदाज उस्मान ख्वाजा, कॅमरून ग्रीन, बीऊ वेबस्टर, पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांचा समावेश आहे. रबाडाच्या भेदक गोलंदाजीमुळे दक्षिण अफ्रिकेचा पहिल्या दिवसावर वरचष्मा राहिला आहे. आता दक्षिण अफ्रिकेचे फलंदाज पहिल्या डावात कशी कामगिरी करतात याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. जर पहिल्या डावात 212 धावा ओलांडून आघाडी घेतली तर विजय पक्का होऊ शकतो.

ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन ही जोडी मैदानात उतरली होती. पण संघाच्या 12 धावा असताना उस्मान ख्वाजा बाद झाला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर आलेला कॅमरून ग्रीनही काही खास करून शकला नाही. त्याने 4 धावा केल्या आणि रबाडाच्या गोलंदाजीवर तंबूत परतला. त्यानंतर मार्नस लाबुशेन 17 धावांवर बाद झाला. एका बाजूने स्टीव्हन स्मिथने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ट्रेव्हिस हेड अवघ्या 11 धावा करू तंबूत परतला. स्टीव्हन स्मिथ आणि वेबस्टरने पाचव्या विकेटसठी 79 धावांची भागीदारी केली. स्टीव्हन स्मिथ 66 धावांवर बाद झाला. तर वेबस्टरने 72 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त मोठी धावसंख्या उभारण्यास इतर खेळाडूंना अपयश आलं. एलेक्स कॅरे 23, पॅट कमिन्स 1, मिचेल स्टार्क 1 आणि लियान 0 धावा करून बाद झाला.

कगिसो रबाडा व्यतिरिक्त मार्को यानसेन सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने 14 षटकात 5 षटकं निर्धाव टाकली आणि 49 धावा देत 3 गडी बाद केले. तर केशव महाराज आणि एडन मार्करम यांना प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश आलं आहे. पहिल्या डावात आता सावध खेळी करून मोठी आघाडी घेण्याची संधी दक्षिण अफ्रिकन फलंदाजांकड आहे. तसेच ऑस्ट्रेलियन गोलंदाज कशी गोलंदाजी करतात याकडे लक्ष लागून आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.