AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : जोहान्सबर्गमधला पराभव जिव्हारी, टीम इंडियाचा WTC च्या फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर

जोहान्सबर्गमध्ये भारताचा पराभव करून दक्षिण आफ्रिकेने नवीन वर्षातील पहिला कसोटी विजय नोंदवला. या विजयासह त्यांचे WTC च्या गुणतालिकेत खातेही उघडले. एक विजय आणि एका पराभवानंतर त्यांचे आता 12 गुण झाले आहेत.

IND vs SA : जोहान्सबर्गमधला पराभव जिव्हारी, टीम इंडियाचा WTC च्या फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर
Team India
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jan 07, 2022 | 12:47 PM
Share

डरबन : जोहान्सबर्गमधील पराभवानंतर टीम इंडियाचे दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा अधांतरी आहे. दोन्ही संघांमधील 3 कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. म्हणजेच आता केपटाऊनमधील तिसरी कसोटी निर्णायक आणि रोमांचक ठरणार आहे. दरम्यान, जोहान्सबर्गमधील पराभवाचा टीम इंडियाला फटका बसला आहे. या पराभवाचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेवरही परिणाम दिसून आला. यजमान दक्षिण आफ्रिकेने भारताला हरवून गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठणे सध्या थोडे कठीण दिसत आहे. डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना खेळण्याचा भारताचा मार्ग आता टीम इंडियाच्या पुढील प्रवासावर अवलंबून आहे. (WTC Points Table : Team India slipped to fourth place after KL Rahul and co. suffer 7-wicket loss to South Africa in 2nd Test)

जोहान्सबर्गमध्ये भारताचा पराभव करून दक्षिण आफ्रिकेने नवीन वर्षातील पहिला कसोटी विजय नोंदवला. या विजयासह त्यांचे WTC च्या गुणतालिकेत खातेही उघडले. एक विजय आणि एका पराभवानंतर त्यांचे आता 12 गुण झाले आहेत आणि ते आता गुणतालिकेत भारतानंतर पाचव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया 36 गुण आणि 100% विजयासह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे श्रीलंकेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2 कसोटी जिंकून श्रीलंकेचे 24 गुण आहेत. या दोन्ही अव्वल संघांनी आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. दुसरीकडे, पाकिस्तानचा संघ 3 विजय, 1 पराभव, 36 गुण आणि 75% विजयांच्या टक्केवारीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

WTC मध्ये भारताची तिसरी मालिका

जोहान्सबर्गमधील पराभवामुळे गुण आणि विजयाच्या टक्केवारीत भारतीय संघाला फटका बसला आहे. टीम इंडिया सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील तिसरी मालिका खेळत असून भारताने आतापर्यंत 4 विजय मिळवले आहेत, 2 सामने गमावले आहेत आणि 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. टीम इंडियाच्या विजयाची टक्केवारी 55.21 वर आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर, टीम इंडियाला स्लो ओव्हर रेटमुळे 3 गुणांचा फटका बसला आहे, ज्यामुळे त्यांचे गुण देखील 53 वर आले आहेत आणि ते सध्या टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत.

टीम इंडियाचा पुढचा मार्ग खडतर

WTC ची अंतिम फेरी खेळण्यासाठी भारताला टॉप 2 संघात राहणे आवश्यक आहे. आणि यासाठी टीम इंडियाला आता आगामी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. भारताचे अजून 3 सामने बाकी आहेत. या 3 मधील एक सामना केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर उर्वरित 2 सामने श्रीलंकेविरुद्ध देशांतर्गत मैदानावर होणार आहेत. केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून भारताने कसोटी मालिका जिंकली आणि त्यानंतर श्रीलंकेला त्यांच्याच भूमीवर पराभूत केले, तर त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो.

इतर बातम्या

IND VS SA: भारताने ‘या’ पाच चुकांमुळे गमावली जोहान्सबर्ग कसोटी

IND VS SA: एल्गरने करुन दाखवलं! दक्षिण आफ्रिकेचा भारतावर शानदार विजय

IND VS SA: जबरदस्त, बुमराह-शामीचे बॉल शेकले पण हार न मानता एल्गरने झळकावलं झुंजार अर्धशतक

(WTC Points Table : Team India slipped to fourth place after KL Rahul and co. suffer 7-wicket loss to South Africa in 2nd Test)

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?