IPL 2023 : Yashasvi jaiswal साठी एक मोठ्या माणसाच टि्वट, हाच BCCI चा ग्रीन सिग्नल
Yashasvi jaiswal IPL 2023 : Yashasvi jaiswal ची टीम इंडियात येण्याची वेळ जवळ आली आहे. बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने खास त्याच्यासाठी टि्वट केलय. मुंबईच्या या मुलाने आपल्या खेळाने सर्वांच मन जिंकलय.

मुंबई : मुंबईचा 21 वर्षाचा मुलगा यशस्वी जैस्वालने आयपीएलमध्ये इतिहास रचलाय. तो सर्वात वेगवान अर्धशतक फटकावणारा फलंदाज ठरलाय. 21 वर्षाच्या यशस्वीने गुरुवारी रात्री जबरदस्त बॅटिंग केली. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध 13 चेंडूत अर्धशतक झळकावलं. याआधी वेगवान हाफ सेंच्युरीचा रेकॉर्ड केएल राहुल आणि ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सच्या नावावर आहे. दोघांनी 14-14 चेंडूत अशी कामगिरी केली होती.
मुंबईचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने आपल्या आक्रमक खेळाने बीसीसीआयसह माजी क्रिकेटपटूंना रोमांचित केलय. केकेआर विरुद्ध यशस्वी जैस्वालने नाबाद 98 धावा केल्या. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वनडे वर्ल्ड कप होणार आहे. यशस्वीने त्याच्या फलंदाजीने टीम इंडियासाठी आपली दावेदारी सादर केली आहे.
अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय
यशस्वी 98 रन्सवर नाबाद राहिला. त्याला शतकासाठी अवघ्या 2 धावा कमी पडल्या. त्याने 47 चेंडूंचा सामना केला. 209 चा त्याचा स्ट्राइक रेट होता. त्याने 12 फोर आणि 5 सिक्स मारले. चालू आयपीएल सीजनमध्ये त्याच्या 500 धावा पूर्ण झाल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय बनलाय.
बीसीसीआयकडून ग्रीन सिग्नल
राजस्थानने या महत्वाच्या सामन्यात केकेआरला 9 विकेटने हरवून आपल्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. यशस्वीची इनिंग पाहून बीसीसीआयचे सचिव जय शाह सुद्धा स्वत:ला रोखू शकले नाहीत. त्यांनी एक खास टि्वट केलं. यशस्वीसाठी बीसीसीआयचा हा ग्रीन सिग्नल मानला जात आहे.
A special knock by young @ybj_19 for hitting the fastest IPL fifty. He has shown tremendous grit and passion towards his game. Congratulations on achieving history. May you continue this fine form in future. #TATAIPL2023
— Jay Shah (@JayShah) May 11, 2023
‘इतिहास घडवल्याबद्दल अभिनंदन’
“यशस्वी जैस्वालची ही इनिंग खास आहे. त्याने आयपीएलमधील वेगवान अर्धशतक झळकावलं. त्याची हिम्मत आणि खेळाबद्दलची तळमळ दिसून आली. इतिहास घडवल्याबद्दल अभिनंदन. असाच तुझा फॉर्म भविष्यात कायम राहू दे” असं जय शाह यांनी म्हटलय. यशस्वी जैस्वालची टीम इंडियाकडून खेळण्याची वेळी आलीय, असं रवी शास्त्री म्हणाले. पुढच्या 3 महिन्यात त्याला टीम इंडियात स्थान मिळेल, असं आकाश चोपडाने लिहिलं आहे.
