नवी दिल्ली: माजी कर्णधार कपिल देव हे टीम इंडियाच्या कामगिरीवर नेहमीच परखडपणे भाष्य करतात. याआधी सुद्धा कपिल देव यांनी अनेक विषयांवर आपली स्पष्ट मत मांडली आहेत. आताही कपिलदेव यांनी टीम इंडियाच्या सेमीफायनलमधील पराभवावर मत मांडलं आहे. टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये काल टीम इंडियाचा पराभव झाला. इंग्लंडच्या टीमने तब्बल 10 विकेटने भारतावर विजय मिळवला.