युजवेंद्र चहलची वाईट सवय नकळत कॅमेऱ्यात चित्रित! फ्लाइटमधील व्हिडीओनंतर खळबळ

आयपीएल 2026 स्पर्धेदरम्यान काही घडामोडींमुळे वादाची किनार लाभली आहे. काही खेळाडूंचं वागणं या स्पर्धेच्या छबीला धक्का लावणारं ठरलं आहे. आता पंजाब किंग्सचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या कृतीमुळे नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

युजवेंद्र चहलची वाईट सवय नकळत कॅमेऱ्यात चित्रित! फ्लाइटमधील व्हिडीओनंतर खळबळ
रियान परागनंतर युजवेंद्र चहलची वाईट सवय नकळत कॅमेऱ्यात चित्रित! फ्लाइटमधील व्हिडीओनंतर खळबळ
Image Credit source: X/PTI
| Updated on: May 07, 2026 | 4:22 PM

आयपीएल 2026 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्याकडे कूच करत आहे. टॉप 4 मध्ये कोणते संघ असतील यासाठी धडपड सुरू झाली आहे. एकीकडे स्पर्धेची रंगत वाढली असताना काही खेळाडूंच्या कृतीमुळे वादाची किनारही लाभली आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने ड्रेसिंग रूममध्ये ई सिगरेट ओढल्याने वाद निर्माण झाला होता. त्यासाठी त्याला दंडही ठोठावण्यात आला आहे. हे प्रकरण शांत होत नाही तोच आणखी प्रकरण समोर आलं आहे. आता रियान परागसारखी कृती करताना पंजाब किंग्सचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल याने केली आहे. यावरून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत युजवेंद्र चहल फ्लाईटमध्ये ई-सिगरेटचा वापर करताना व्हिडीओत रेकॉर्ड झाला आहे. हा व्हिडीओ पंजाब किंग्सच्या प्रवासादरम्यानचा असल्याचं बोललं जात आहे.

आयपीएल 2026 दरम्यान पंजाब किंग्स संघाने हा व्हिडीओ अधिकृत खात्यावर पोस्ट केला होता. खरं तर हा व्हिडीओ पोस्ट करताना मागे युजवेंद्र चहल काय करतो हे लक्षात आलं नाही. पण नेटकऱ्यांनी बरोबर हेरलं आणि आता हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संघाला या बाबतची माहिती मिळताच त्यांनी हा व्हिडीओ काढून टाकला. पण तिथपर्यंत अनेक युजर्संनी हा व्हिडीओ डाउनलोड केला होता. आता त्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याची चर्चा रंगली आहे. क्रिकेटपटूंची अशी कृती पाहून क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

फ्लाईटच्या आत कोणत्याही प्रकारचं धूम्रपान किंवा ई-सिगरेट पिण्यावर बंदी आहे. नियमानुसार, फ्लाइटमध्ये ई-सिगरेट घेऊन जाणं आणि त्याचा वापर करणं गंभीर गुन्हा आहे. यामुळे आग लागण्याची भीती असते. इतकंच काय विमान आणि त्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी धोकादाय असतं. जर या प्रकरणी तक्रार दाखल केली गेली तर खेळाडूवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. इतकंच काय तर नो फ्लाई यादीतही त्याचा समावेश केला जाऊ शकतो. यापूर्वी सोशल मीडियावर त्याचा आणखी व्हिडीओ समोर आला होता. यात चहल टू सीटर बीएमडब्ल्यू चालवत होता आणि त्याने पेटलेली सिगारेट बाहेर फेकली होती. यावरून सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला होता.

Follow Us