AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतम गंभीरची अशी कोचिंग पाहून झहीर खान भडकला! म्हणाला; ‘यामुळे टीम इंडिया…’

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेली वनडे मालिका टीम इंडियाने आधीच खिशात घातली आहे. त्यामुळे अहमदाबादमध्ये होणारा तिसरा वनडे सामना हा औपचारिक असणार आहे. पण या सामन्यापूर्वीच गौतम गंभीरच्या कोचिंग स्टाईलवर माजी क्रिकेटपटू झहीर खान याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

गौतम गंभीरची अशी कोचिंग पाहून झहीर खान भडकला! म्हणाला; 'यामुळे टीम इंडिया...'
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 11, 2025 | 3:22 PM
Share

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी गौतम गंभीर यांची वर्णी लागल्यापासून टीका होत आहे. त्याची शैली आणि इतर काही बाबींवर वारंवार टीका होताना दिसत आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली बरेच बदल झाले आहे. हे बदल पाहून क्रीडातज्ज्ञ आश्चर्यचकीत झाले आहेत. आता माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज झहीर खानने सुद्धा गौतम गंभीरच्या कोचिंग स्टाईलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कारण इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही वनडे सामन्यात केएल राहुलला पाचव्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवलं होतं. खरं तर त्याची जागा पाचव्या क्रमांकावर असायला हवी असं त्यांचं म्हणणं आहे. केएल राहुलची जागा बदलल्याने तो दोन्ही सामन्यात फेल गेला. यावर श्रीकांतने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. आता झहीर खान यानेही याच मुद्द्याला हात घातला आहे. इतकंच काय तर या निर्णयामुळे खेळाडूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते असंही त्याने अधोरेखित केलं.

झहीर खानने क्रिकबझशी बोलताना सांगितलं की, ‘तुम्ही सांगता की फलंदाजीत लवचिकपणा असला पाहीजे. नंबर एक आणि दोनची पोझिशन तशीच राहील. पण इतरांना आपल्या पोझिशन बदलासाठी तयार राहिलं पाहीजे. पण या लवचिकपणासाठी काही नियम आहेत. काही प्रोटोकॉल फॉलो करावे लागतात. चर्चा होणं गरजेचं आहे. नाही तर असुरक्षेची भावना निर्माण होईल आणि तुम्हाला अडचणीत आणेल.’ झहीर खान अप्रत्यक्षरित्या केएल राहुलबाबतच आपलं मत मांडत होता हे दिसत आहे. झहीर खानच्या मते, संघात गरजेपेक्षा जास्त बदल नुकसान करणारं आहे. यामुळे राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली जास्त बदल होत नव्हते.

केएल राहुल सलग दोन वनडे सामन्यात फेल गेला आहे. त्यामुळे तिसऱ्या वनडे सामन्यात केएल राहुल की ऋषभ पंतला संधी मिळेल याबाबत चर्चा आहे. केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतलं तर त्याला पुन्हा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागणार का? सध्या टीम इंडियात उजवा डावा असा प्रकार फलंदाजीचा पॅटर्न वापरला जात आहे. त्यामुळे अक्षर पटेलला केएल राहुलच्या आधी खेळण्याची संधी मिळत आहे. पण केएल राहुल फेल गेला तर चॅम्पियन्स ट्रॉफीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.