क्रिकेटपटूंना अतिआत्मविश्वास नडला अन् इथेच कोरोनाने डाव साधला, पाहा IPL मध्ये कोरोनाची एन्ट्री कशी झाली…

आयपीएल स्पर्धेअगोदर खेळाडूंनी कोरोनाची लस घेण्यास नकार दिला होता. त्यांनी अतिआत्मविश्वासाने 'बायो बबल ही सुरक्षित जागा आहे. इथे कोरोनाची एन्ट्री शक्य नाही', असं म्हणून लसीला नकार दिला, असं रिपोर्टमध्ये म्हटलंय. (Cricketer Denies to take Covid 19 Vaccine before IPL 2021)

क्रिकेटपटूंना अतिआत्मविश्वास नडला अन् इथेच कोरोनाने डाव साधला, पाहा IPL मध्ये कोरोनाची एन्ट्री कशी झाली...
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 1:27 PM

मुंबई : आयपीएल (IPL 2021) स्पर्धेत बायो बबल असूनही कोरोना व्हायरसने एन्ट्री केलीच कशी?, असा प्रश्न जगातील क्रिकेट फॅन्सना पडला आहे. याचं उत्तर आता समोर आलंय असं म्हणता येईल. एका रिपोर्टनुसार, आयपीएल स्पर्धेअगोदर खेळाडूंनी कोरोनाची लस घेण्यास नकार दिला होता. त्यांनी अतिआत्मविश्वासाने ‘बायो बबल ही सुरक्षित जागा आहे. इथे कोरोनाची एन्ट्री शक्य नाही’, असं म्हणून लसीला नकार दिला. खेळाडूंचा हाच अतिआत्मविश्वास नडला आणि कोरोनाने इथेच डाव साधला असं म्हणावं लागेल. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, खेळाडू बायो बबलमध्ये असल्याने स्वत:ला या जागी सुरक्षित मानून त्यांनी आयपीएल स्पर्धेअगोदर लस घेण्यास नकार दिला होता.  (Cricketer Denies to take Covid 19 Vaccine before IPL 2021)

आयपीएलच्या 14 पर्वातील 29 मॅचेस अगदी सुरळित पार पडल्या. मात्र कोलकात्याच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने सामना स्थगित करावा लागला. नंतर चेन्नई, हैदराबाद अशा फ्रँचायजींमधल्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आणि बीसीसीआयने मोठा निर्णय घेत आयपीएलचं 14 वं पर्व अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

लस घेण्यास खेळाडूंचा नकार -रिपोर्ट

खेळाडू कोरोना लस घेण्याच्या विरोधात होते. खरं तर, त्यांच्या विरोधापेक्षाही लसीविषयी जागरुकता म्हणावी तशी झाली नव्हती. खेळाडूंमध्ये देखील जागरुकतेचा अभाव असल्याचे दिसून आले. बबल त्यांच्यासाठी एक सुरक्षित ठिकाण आहे आणि अशा वातावरणात त्यांना कोरोना लसीची आवश्यकता नाही, असा विचार खेळाडूंनी केला होता. तसंच त्यांच्या फ्रँचायजीने देखील त्यांना लस घेण्याबद्दल आग्रह केला नव्हता.

अन् आयपीएलमध्ये कोरोनाने एन्ट्री केली…!

आयपीएलच्या पर्वात जवळपास अर्धा डझन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. कोरोनाची सगळ्यात जास्त झळ पोहोचली ती किंग खान शाहरुखच्या कोलकाता संघाला. कोलकाच्याच्या 4 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर्स, प्रसिद्ध कृष्णा आणि टीम सेफर्ट यांना कोरोनाने ग्रासलं.

चेन्नई संघाचा बोलिंग कोच आणि बॅटिंग कोच या दोघांनाही कोरोनाने गाठलं. लक्ष्मीपती बालाजी आणि माईक हसीला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना उपचारासाठी दिल्लीहून चेन्नईला हलविण्यात आलं होतं.

दिल्लीच्या अमित मिश्रा आणि हैदराबादच्या विकेट किपर फलंदाज वृद्धीमान सहाला कोरोनाची लागण झाली. वृद्धीमान साहा वगळता आता सगळ्यांनी कोरोनावर मात केली आहे.

सध्या लस कुणी कुणी घेतली?

लसीविषयी जनजागृती झाल्यानंतर आता खेळाडूंनी लस घ्यायला सुरुवात केली आहे. इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी खेळाडू लसीचा पहिला डोस घेत आहेत. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा या खेळाडूंनी लस टोचून घेतली आहे.

(Cricketer Denies to take Covid 19 Vaccine before IPL 2021)

हे ही वाचा :

कोहली बाबर आझमच्या ‘एक पाऊल पुढे’, पाकिस्तानच्या दिग्गजाची विराटवर स्तुतीसुमने

Video : दुखापतीनंतर जोरदार पुनरागमन, जोफ्रा आर्चरचा डोकं फोडणारा बाऊन्सर, बॅट्समन थोडक्यात वाचला!

Non Stop LIVE Update
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.