AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jasprit Bumrah Marriage | जसप्रीत बुमराहची आजपासून नवी इनिंग, स्टार अँकरसोबत लगीनगाठ

क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन (sanjana ganesan) विवाहबद्ध झाले आहेत.

Jasprit Bumrah Marriage | जसप्रीत बुमराहची आजपासून नवी इनिंग, स्टार अँकरसोबत लगीनगाठ
क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन (sanjana ganesan) विवाहबद्ध झाले आहेत.
| Updated on: Mar 15, 2021 | 4:19 PM
Share

गोवा : टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)  विवाहबद्ध झाला आहे. बुमराह प्रसिद्ध क्रीडा निवेदिका संजना गणेशनसोबत (sanjana ganesan) लग्नबेडीत अडकला आहे. हा विवाहसोहळा गोव्यात पार पडला आहे. लग्नासाठी संजना गणेशन आणि आणि (Anupama Parameswaran) दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन यांच नाव चर्चेत होतं. पण अखेर बुमराह संजनासोबत लगीनगाठ बांधली आहे. यामुळे आता सर्व प्रश्नांना पूर्णविराम मिळाला आहे. आता बुमराहच्या जीवनातील नव्या इनिंगला सुरुवात झाली आहे. बुमराहने विवाहासाठी इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी आणि टी 20 मालिकेतून माघार घेतली होती. (cricketer Jasprit Bumrah getting married 15 march with Sports anchor Sanjana Ganesan in goa)

मोजक्याच जणांची उपस्थिती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुमराहचं लग्न मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. टाईम्स नाऊनुसार रविवारी गोव्यात लग्नापूर्वीच्या सर्व विधी पार पडल्या. विवाहादरम्यान या दोघांनी आपले फोटो व्हायरल होणार नाही, याची पुरेपुर काळजी घेतली. मात्र त्यानंतरही या दोघांचे लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

कोण आहे संजना गणेशन?

संजना ही प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेजेंटेटर आहे. ती सध्या स्टार स्पोर्ट्ससोबत काम करत आहे. संजनाने आतापर्यंत अनेक कार्यक्रम होस्ट केले आहेत. संजना स्पिलिट्सविला या रिअॅलिटी शोच्या 7 व्या मोसमातही सहभागी झाली होती. तसेच संजनाने 2014 मध्ये मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं. संजनानं 2012 मध्ये सिम्बायोसिसमधून बीटेक पर्यंत शिक्षण घेतलं आहे. यानंतर तिने काही वर्ष सॉफ्टवेअर इंजिनिअरचं कामही केलं आहे.

संबंधित बातम्या :

PHOTO | जसप्रीत बुमराहची भावी पत्नी संजना गणेशन इतक्या वर्षाने मोठी, ‘या’ अभिनेत्याला केलं होतं डेट

ठरलं! जसप्रीत बुमराहच्या लग्नाचा बार उडणार; ‘या’ दिवशी गोव्यात संजना गणेशनसोबत बांधणार लगीनगाठ

PHOTO | ‘यॉर्कर किंग’ आणि ‘स्टार’ अँकर लग्नबेडीत, जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन विवाहबद्ध

(cricketer Jasprit Bumrah getting married 15 march with Sports anchor Sanjana Ganesan in goa)

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.