अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली, T20 मध्ये भारतीय फलंदाजाचं केवळ 17 चेंडूत शतक

मेघालय संघाचा कर्णधार पुनीत बिष्ट याने 51 बॉलमध्ये तडाखेबाज 146 रन्स ठोकल्या.

अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली, T20 मध्ये भारतीय फलंदाजाचं केवळ 17 चेंडूत शतक

नवी दिल्ली : क्रिकेटच्या इतिहासात एक सोनेरी पान लिहिलं गेलं आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ( Syed Ali Mushtaq Trophy) बुधवारी मेघालय आणि मिझोरम (Meghalay Vs Mizoram) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात मेघालय संघाचा कर्णधार पुनीत बिष्ट (Punit Bisht) याने 51 बॉलमध्ये तडाखेबाज 146 रन्स ठोकल्या. यामध्ये त्याने 17 षटकार खेचताना 102 रन्सचा पाऊस पाडला. याअगोदर क्रिकेटमध्ये असं कधीच झालं नाही की बॅट्समनने 17 चेंडूत 100 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. परंतु पुनीत बिष्टने हा विक्रम केला आहे. (Cricketer Punit Bisht Century Syed Ali Mushtaq Trophy Meghalay Vs Mizoram)

पुनीत बिष्टने खेळलेल्या धडाकेबाज 146 रन्सच्या खेळीत 102 रन्स फक्त षटकारांनी केले. त्याने एकूण 17 षटकार खेचले तर 6 चौकारही लगावले. चौकार-षटकारांमध्ये सांगायचं झालं तर त्याने 23 बॉलमध्ये 126 रन्स ठोकले. विकेटकीपर बॅट्समन असलेल्या पुनीतने क्रमांका चारवर येऊन 286.27 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली.

पुनीत बिष्टच्या या वादळी खेळीने पहिली बॅटिंग करणाऱ्या मेघालयने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 230 रन्स केले. पुनीतशिवाय मेघालय संघाचा सलामीवीर योगेश तिवारीने 47 बॉलमध्ये 53 रन्सची खेळी केली. त्याच्या या खेळीला त्याने 6 चौकार आणि 2 षटकारांचा साज चढवला.

मिझोरमचा बोलर कोहलीला पुनीत बिष्टच्या वादळाचा सामना करावा लागला. बिष्टच्या वादळात कोहली आडवा झाला. कोहलीने 3 ओव्हरमध्ये तब्बल 46 रन्सची खिरापत वाटली. कोहलीने तर खिरापत वाटलीच शिवाय प्रतीक देसाईने 4 ओव्हरमध्ये 46 रन्स दिले तर लालनकिमाने 4 ओव्हरमध्ये 45 रन्स दिले.

रणजीमध्ये खेळताना पुनीत बिष्टच्या नावावर तिहेरी शतक

सध्या 34 वर्षांचा असलेला पुनीत बिष्टचा जन्म दिल्लीमध्ये झालाय. पुनीत घरेलू क्रिकेटमध्ये खेळताना दिल्लीकडून विकेटकीपर फलंदाजाची भूमिका पार पाडतो. पुनीत 2012 या वर्षी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडूनही खेळला आहे. 2012-2013 च्या रणजी सिझनमध्ये त्याने दुहेरी शतकाच्या बळावर 502 धावांचा रतीब घातला होता. याशिवाय 21 कॅचेस घेत प्रतिस्पर्धी संघाच्या बॅट्समनना तंबूत पाठवण्यात मोठा वाटा उचलला होता. तसंच 2018 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये त्याने त्याच्या कारकीर्दीमधलं तिहेरी शतकही झळकावलं होतं.

(Cricketer Punit Bisht Century Syed Ali Mushtaq Trophy Meghalay Vs Mizoram)

संबंधित बातम्या

VIDEO : तब्बल 7 वर्षांनी श्रीसंतला पहिली विकेट, खाली वाकून पिचला ‘सलाम’

डेव्हिड वार्नरची इन्स्टाग्राम पोस्ट, टीम इंडियासह मोहम्मद सिराजची मागितली माफी

Published On - 3:03 pm, Wed, 13 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI