AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : तब्बल 7 वर्षांनी श्रीसंतला पहिली विकेट, खाली वाकून पिचला ‘सलाम’

भारताचा जलदगती गोलंदाज एस. श्रीशांतने (S Sreesanth) क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे.

VIDEO : तब्बल 7 वर्षांनी श्रीसंतला पहिली विकेट, खाली वाकून पिचला 'सलाम'
| Updated on: Jan 12, 2021 | 6:47 PM
Share

मुंबई :  भारताचा जलदगती गोलंदाज एस. श्रीशांतने (S Sreesanth) क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. तब्बल 7 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर श्रीशांतने पाऊल ठेवलं आहे. बीसीसीआयच्या सय्यद मुश्ताक अली करंडकातून (Sayyed Mushtaq Ali Trophy) श्रीशांतने क्रिकेटमध्ये थाटात पुनरागमन केलं. तब्बल 7 वर्षानंतर त्याला पहिली विकेट मिळाली. (Cricketer Sreesanth return on Cricket Ground After 7 Year)

श्रीशांतने 7 वर्षानंतर क्रिकेट ग्राऊंडवर पाय ठेवला. श्रीशांतने पहिल्याच स्पेलमध्ये दमदार गोलंदाजी केली. त्याने केवळ आपल्या स्पेलच्या 4 ओव्हरच टाकल्या नाहीत तर प्रतिस्पर्धी संघाच्या ओपनर बॅट्समनची दांडी गुल केली.

श्रीशांतने सय्यद अली मुश्ताक ट्रॉफीमध्ये केरळकडून सात वर्षांनी पुनरागमन केलं. पॉंडेचरीविरुद्ध खेळताना त्याने सामन्याची दुसरी ओव्हर टाकली. त्याच्या या ओव्हरमध्ये फलंदाजांनी 13 रन्स काढले. तसंच खणखणीत दोन चौकार लगावले. भलेही श्रीशांतने पहिल्या ओव्हरमध्ये विकेट मिळवली नाही पण दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने ओपनर बॅट्समन फाबिद अहमदला क्लीन बोल्ड केलं.

केरळ क्रिकेट असोसिएशनने (kerala Cricket Association) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी 26 सदस्यीय संभाव्य खेळाडूंची निवड केली असून त्यात श्रीशांतच्या नावाचाही समावेश केला होता ही स्पर्धा 10 जानेवारी 2021 पासून खेळवली जात आहे.

बीसीसीआयने श्रीशांतवर 2013 साली आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदी घातली होती. ही बंदी या वर्षी संपली आहे. श्रीशांतने याबद्दलची माहिती ट्विट करुन दिली आहे. डोमेस्टिक क्रिकेट खेळून भारतीय संघात पुनरागमन करेल, अशी आशा श्रीशांतने व्यक्त केली आहे. यंदाचा 2023 चा वर्ल्ड कप खेळण्याची माझी खूप इच्छा आहे. त्यासाठी मी जीवापाड मेहनत करतोय, अशी माहितीही श्रीशांतने दिली.

बंदीअगोदर श्रीशांतचा गोलंदाजीत एकप्रकारचा दबदबा होता. श्रीशांतची सर्वोत्कृष्ट भारतीय गोलंदाज म्हणून गणना केली जाई. परंतु फिक्सिंगनंतर त्याची कारकीर्द डळमळीत झाली.

आपल्या कारकीर्दीत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 169 विकेट घेतल्या असून एकदिवसीय सामन्यात 87 बळी तर कसोटी क्रिकेटमध्ये 75 बॅट्समनना त्याने आऊट केलंय.

(Cricketer Sreesanth return on Cricket Ground After 7 Year)

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.