‘धाकड गर्ल’ गीता फोगट आई झाली!

प्रसिद्ध कुस्तीपटू गीता फोगट हिने मंगळवारी मुलाला जन्म दिला. तिचा पती पवन कुमारही कुस्तीपटू आहे

'धाकड गर्ल' गीता फोगट आई झाली!

नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती, सेलिब्रिटी कुस्तीपटू गीता फोगट मंगळवारी आई झाली. गीता फोगटने एका गोंडस मुलाला जन्म (Wrestler Geeta Phogat Baby) दिला. गीताने पती आणि बाळासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही गोड बातमी सांगितली आहे.

आई झाल्याची ‘गुड न्यूज’ शेअर करताना गीताने इन्स्टाग्रामवर छान कॅप्शनही दिलं आहे. ‘बाळा, तुझं या जगात स्वागत आहे. आम्ही किती प्रेमात आहोत. कृपया याला तुमचं प्रेम आणि आशीर्वाद द्या. त्याने आमचं आयुष्य आता परिपूर्ण केलं आहे. आपल्या मुलाला जन्म देताना पाहण्याचा अनुभव शब्दात वर्णन करण्यापलिकडचा आहे’ अशा शब्दात गीताने ही बातमी दिली आहे.

गीता-बबिता जोडगोळीतील तिची बहीण आणि ‘दंगल गर्ल’ बबिता फोगट हिनेही आपल्या भाच्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. ‘आई झाल्याबद्दल तुझं अभिनंदन. मी आशा करते बाळाला आनंद, प्रेम आणि हास्याने परिपूर्ण दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे.  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याला प्रेम, यश आणि आनंद मिळो. तू आपली परंपरा बाळामध्ये उतरवली आहेस’ असं बबिताने ट्विटरवर लिहिलं आहे.

गीता फोगट हिने 20 नोव्हेंबर 2016 रोजी कुस्तीपटू पवन कुमारशी लग्न केलं होतं. 2010 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी गीता फोगाट ही भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली होती.

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा ब्लॉकबस्टर सिनेमा ‘दंगल’ हा गीता फोगट आणि तिची बहिण बबिता फोगट यांच्या जीवनावर आधारित होता. गीता फोगटने ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता.

Wrestler Geeta Phogat Baby

Published On - 8:12 am, Wed, 25 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI