युजवेंद्र चहलसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच धनश्री वर्माचा धक्कादायक खुलासा, दोघांमध्ये तिसरी व्यक्ती…
Dhanshree Verma Yuzvendra Chahal Divorce : भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल हा मागील काही दिवसांपासून त्याच्या क्रिकेटपेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. त्याने काही दिवसांपूर्वी धनश्री वर्मा हिच्यासोबत घटस्फोट घेतला.

भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा काही दिवसांपूर्वी घटस्फोट झाला. मात्र, त्यांच्या घटस्फोटाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. यादरम्यान अनेकांनी धनश्री वर्मा हिच्यावर गंभीर आरोप केले. पोटगी म्हणून धनश्रीने युजवेंद्रकडून मोठी रक्कम घेतल्याने तिला खडेबोल सुनावण्यात आले. खाजगी आयुष्यातील वादळानंतर धनश्री वर्मा ही राइज एंड फॉल या शोमध्ये पोहोचली आहे. यादरम्यान तिने युजवेंद्र चहलचे नाव घेत काही मोठे खुलासे केले. हेच नाही तर अजूनही घटस्फोटानंतर मनात कुठेतरी एक चांगली जागा युजवेंद्र चहलबद्दल असल्याचे तिने म्हटले. युजवेंद्र चहलसोबत नाते कसे बिघडत गेले, हे देखील धनश्रीने यादरम्यान बोलून दाखवले आणि नेमके काय घडले हे सांगितले.
धनश्री वर्मा अर्जुन बिजलानी याच्यासोबत बोलत असताना तिने युजवेंद्र चहलसोबत नाते कसे सुरू झाले आणि नेमके काय घडले हे सांगितले. धनश्रीने म्हटले की, अरेंज मॅरेज आणि प्रेम दोन्ही होते. आमच्या नात्याची सुरूवात अरेंज मॅरेजनेच सुरू झाली होती. चहलला डेटिंगशिवायच लग्न करायचे होते. माझे कोणतेही प्लनिंग तसे नव्हते. पण यादरम्यान चहलने ज्याप्रकारे माझ्यावर प्रेम केले, त्यानंतर मी मान्य केले.
ऑगस्ट महिन्यात आमचा साखरपुडा झाला आणि डिसेंबरमध्ये लग्न.मी युजवेंद्रसोबत प्रवास करायचे आम्ही दोघे एकत्र राहायचो. मात्र, मला त्यावेळीच त्याच्या काही गोष्टी बदलल्याची जाणीव झाली. जेंव्हा तुम्हाला एखादी गोष्ट आवडते आणि ती गोष्टी तुम्हाला मिळते, त्यानंतर व्यवहारात खूप बदल होतो. मी त्याला बदलताना बघितले. मात्र, मला माझ्या नात्यावर खूप जास्त विश्वास होता.
माझी एकच चूक आहे की, मी माझ्या लोकांना खूप जास्त संधी देते. मी आमचे नाते सांभाळण्यासाठी माझ्याकडून शक्य तितके प्रयत्न केले. पण एकवेळनंतर मला समजले की, काहीच होऊ शकत नाही. यादरम्यान अर्जुन याने धनश्रीला विचारले की, तुमच्या दोघांमध्ये कोणी तिसरा व्यक्ती होती का? यावर बोलताना धनश्रीने म्हटले की, आपण यावर पुन्हा कधी बोलू.. मला नेहमीच काळजी वाटते…आणि ही काळजी कधीच संपणार नाहीये. हे बोलताना धनश्री वर्मा अत्यंत भावूक होताना देखील दिसली.
