AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND : शुबमन गिल वनडे टीम इंडियाचा नवा कॅप्टन, बीसीसीआयने रोहित शर्माचे पंख छाटले!

Shubman Gill Team India Odi Captain : बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने शुबमन गिल याची भारतीय संघाच्या एकदिवसीय कर्णधारपदी नियुक्ती केली आहे.

AUS vs IND : शुबमन गिल वनडे टीम इंडियाचा नवा कॅप्टन, बीसीसीआयने रोहित शर्माचे पंख छाटले!
Shubman Gill Team India Odi CaptainImage Credit source: PTI
| Updated on: Oct 04, 2025 | 4:03 PM
Share

क्रिकेट विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय आणि टी 20I मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. तसेच बीसीसीआयने एकदिवसीय कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आता रोहित शर्माऐवजी शुबमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर श्रेयस अय्यर याला उपकर्णधार करण्यात आलं आहे. तर सूर्यकुमार यादव टी 20I संघाचं नेतृत्व करणार आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 3 एकदिवसीय आणि 5 टी 20i सामने खेळणार आहे.

शुबमन  गिल याच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी बीसीसीआय निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील संघ निवडीसह टीम इंडियाच्या भविष्याबाबतही चर्चा करण्यात आली.  निवड समिती अध्यक्ष आणि सदस्य यांच्यात शुबमनच्या नावावर एकमत झालं. त्यानुसार शुबमनला कर्णधार करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर कर्णधार म्हणून शुबमनच्या नावाची घोषणा करण्यात आली.

शुबममने इंग्लंड दौऱ्यात कर्णधार आणि फलंदाज म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच शुबमन एकदिवसीय क्रिकेटमध्येही सातत्याने खेळतोय. शुबमन तिन्ही फॉर्मेटसाठी सेट आहे. शुबमन फॉर्मेटनुसार खेळतो. ही वैशिष्ट्य पाहता शुबमनला कर्णधार करण्यात आलं, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

मार्चमध्ये उपकर्णधारपदाची जबाबदारी

शुबमनला मार्च महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेआधी एकदिवसीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यांनी रोहित शर्मा याने इंग्लंड दौऱ्याआधी कसोटी क्रिकेटला अलविदा केला. रोहितनंतर विराटनेही तडकाफडकी निवृत्ती घेतली. त्यामुळे शुबमनला कसोटी संघाच्या कर्णधारपदाची सूत्र सोपवण्यात आली.

शुबमनने रोहित-विराटशिवाय इंग्लंड दौऱ्यात धमाका केला. शुबमनने इंग्लंडला त्यांच्याच घरात मालिका जिंकण्यापासून रोखलं. भारताने पाचवा आणि अंतिम सामना जिंकून मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. शुबमनने या मालिकेत बॅट्समन म्हणूनही चाबूक कामगिरी केली. शुबमनने या मालिकेतील 5 सामन्यांमध्ये सर्वाधिक 754 धावा केल्या.

त्यानंतर आता शुबमनची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता शुबमन आपल्या नेतृत्वात एकदिवसीय कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत कशी कामगिरी करतो? याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....