AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित-विराटचं कमबॅक, पहिला सामना केव्हा?

India vs Australia Odi Series 2025 : बीसीसीआय निवड समितीने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन हटवलं आहे.

AUS vs IND : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित-विराटचं कमबॅक, पहिला सामना केव्हा?
Virat Rohit and Shubman Gill Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Oct 04, 2025 | 3:42 PM
Share

टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज विरुद्ध मायदेशात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. टीम इंडिया या मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 19 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान वनडे आणि टी 20I सीरिज खेळणार आहे. उभयसंघातील एकदिवसीय मालिकेत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. तर टी 20I मालिकेत 5 सामन्यांचा थरार रंगणार आहे. बीसीसीआय निवड समितीने या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया

बीसीसीआयने रोहित शर्मा याचा एकदिवसीय कर्णधारपदावरुन पत्ता कट केला आहे. तर शुबमन गिल याला नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच विराट कोहली याचंही एकदिवसीय संघात कमबॅक झालं आहे. टीम इंडियाने याआधी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी फायलनमध्ये 9 मार्च रोजी न्यूझीलंडला पराभूत केलं होतं. भारताचा हा शेवटचा एकदिवसीय सामना होता. त्यानंतर आता 7 महिन्यांनी भारतीय संघ एकदिवसीय सामने खेळणार आहे. चाहत्यांना रोहित-विराटच्या कमबॅकची प्रतिक्षा होती. आता ही प्रतिक्षा अवघ्या काही दिवसांनी संपणार आहे.

श्रेयस अय्यरकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी

निवड समितीने टीम भारताच्या कर्णधारासह उपकर्णधारही बदलला आहे. शुबमनला उपकर्णधारपदावरुन कर्णधार करण्यात आलं. त्यामुळे आता शुबमननंतर श्रेयस अय्यर टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. श्रेयस एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार होता. रोहितनंतर श्रेयसला कॅप्टन करण्यात येईल, अशी चर्चा होती. मात्र ही फक्त चर्चात ठरलीय.

दोघांना पदार्पणाची संधी मिळणार?

तसेच एकदिवसीय संघात नव्या दमाच्या खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूंमध्ये नितीश कुमार रेड्डी आणि ध्रुव जुरेल यांचा समावेश करण्यात आला आहे. या दोघांचं अद्याप एकदिवसीय पदार्पण झालेलं नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून पदार्पणाची संधी मिळणार का? याची प्रतिक्षा या दोघांना असणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, रविवार, 19 ऑक्टोबर, पर्थ

दुसरा सामना, मंगळवार, 23 ऑक्टोबर, एडलेड

तिसरा आणि अंतिम सामना, शनिवार, 25 ऑक्टोबर, सिडनी.

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया : शुबमन गिल (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जैस्वाल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...