AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या तोंडातून रक्त निघालं, बुक्के मारले, राहुल गांधींनी सांगितलं मारहाण कशी झाली; आंदोलनात काय घडलं?

मंगळवारी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन केलं, या आंदोलनावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

माझ्या तोंडातून रक्त निघालं, बुक्के मारले, राहुल गांधींनी सांगितलं मारहाण कशी झाली; आंदोलनात काय घडलं?
Rahul GandhiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 22, 2026 | 5:42 PM
Share

सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता, मात्र यावेळी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला, त्यानंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं आहे. पुन्हा एकदा दिल्लीमधील जंतर मंतरवर आंदोलन सुरू करण्यात आलं आहे, तर दुसरीकडे मंगळवारी काँग्रेसने देखील या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गाधी यांनी मंगळवारी तब्बल तीन तास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं, यावेळी आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी? 

आम्हाला वाटतं हा मध्यवर्ती मुद्दा आहे. त्यावर निर्णय आला पाहिजे. आम्हाला बदल हवा आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठीच आम्ही मोदींच्या घरासमोर आंदोलन केलं. आम्ही विद्यार्थी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देत आहोत. माझ्या तोंडातून काल रक्त येतं होतं. आम्ही पूर्ण पाठिंबा देत आहोत. जितेंद्र सिंह या चर्चेत इरेलव्हंट आहे. चर्चा सोपी आहे. आमच्या मागण्या स्पष्ट आहेत. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे. ज्यांनी मारहाण केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि मोदींनी माफी मागितील पाहिजे. या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत, असं यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान माझं कर्तव्य लोकांचा आवाज बुलंद करण्याचं आहे. विद्यार्थी असो, तरुण असो की शेतकरी असो त्यांचा आवाज बुलंद करणं हे माझं काम आहे. त्यांच्या वेदनांना वाचा फोडणं आहे. मला पंच बसला ही मोठी गोष्ट नाही. ही काही समस्या नाही. अजून पंच खायला मी तयार आहे. मला माझ्या सुरक्षेची चिंता नाही. पोलिस मला फरफटत घेऊन गेले. पण माझ्या कानात सांगत होते या सरकारला हटवा. खरंच  मी राजस्थानचा आहे, यांना हटवा. आम्ही केवळ वर्दी घालून आलो आहोत, दुसरा म्हणत होता, मी हरियाणाचा आहे. त्यांना हटवा. हे वास्तव आहे. त्या बिचाऱ्यांना फक्त ऑर्डर फॉलो करायची असते, असंही यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Follow Us
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा