AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह

भारत इंग्लंड वनडे मालिका नुकतीच पार पडली. पण ही मालिका गमावल्यानंतर खेळाडूंच्या फिटनेसबाबत बरीच चिंता व्यक्त करण्यात आली आहे. इतकंच काय तर कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिलनेही यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. आता सहा खेळाडूंमुळे टेन्शन वाढलं आहे.

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह
Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्हImage Credit source: Getty Images
| Updated on: Jul 22, 2026 | 5:44 PM
Share

भारतीय संघाची कामगिरी गेल्या काही दिवसात सुमार दर्जाची होत आहे. टी20, वनडे मालिकेत पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे चॅम्पियन टीम इंडियाला झालं तरी काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. खरं तर मैदानात खराब कामगिरी करणाऱ्या संघातील खेळाडूंचा फिटनेसचा मोठा प्रश्न आहे. टीम इंडियात एक दोन नाही तर सहा खेळाडू जखमी आहे. त्यामुळे संघाची मोट बांधणं कठीण झालं आहे. रिपोर्टनुसार, बंगळुरूतील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये क्रिकेटपटूंची उपचारासाठी रांग लागलीय. या आठवड्यात सीओईमध्ये 12 खेळाडू येण्याची शक्यता आहे. म्हणजेच 12 खेळाडूंच्या फिटनेसचा प्रश्न आहे. या खेळाडूंमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंसह देशांतर्गत क्रिकेटरचाही समावेश आहे.

कोणते खेळाडू दुखापतग्रस्त?

टीम इंडियाच्या जखमी असलेल्या खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डी यांचाही समावेश आहे. यासह इंग्लंड दौऱ्यात दुखापतग्रस्त झालेल्या वरूण चक्रवर्ती आणि हर्षित राणा हे देखील सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये उपचार घेत आहेत. आकाश दीपवर आधीच उपचार सुरू आहेत. तर वॉशिंग्टन सुंदरसह इतर खेळाडू लवकरच उपचारासाठी सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये दाखल होणार आहेत. दुसरीकडे, श्रीलंकेत पुढच्या महिन्यात कसोटी मालिका पार पडणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेपूर्वी काही खेळाडूंची फिटनेस देखील घेतली जाणार आहे. यात मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांची नावं आहेत.

भारतीय खेळाडूंच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर इंग्लंड मालिकेसाठी फिट नव्हते. तरीही त्यांची संघात निवड केली गेली. हर्षित राणाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचं वजन खूपच घटलं होतं. पण असं असूनही त्यात सुधारणा होण्याआधीच संघात स्थान मिळालं. दुसरीकडे, वॉशिंग्टन सुंदर टी20 वर्ल्डकप 2026साठी फिट नव्हता. पण त्याला संघात घेतलं गेलं. संघात घेतल्यानंतर 10 ते 12 सामने झाले आणि फिट झाला होता. दरम्यान, फिटनेसच्या चिंतेमुळे भारतीय संघाचं क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचं झालं आहे. झेल सोडण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि गचाळ क्षेत्ररक्षणामुळे अवांतर धावाही जात आहेत.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?