AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 CSK Winner : तेव्हा धोनीच्या डोळ्यांत आले अश्रू…फायनल शॉटनंतर जडेजाला मिठी मारताना भावूक झाला माही ! पहा video

महेंद्रसिंग धोनी हा नेहमीच कूल असतो. मैदानावर एखादी थरारक मॅच सुरू असली तरी धोनी त्याच्या भावनांचे फारसे प्रदर्शन करताना दिसत नाही. आयपीएल 2023 मधील फायनल सामना जिंकल्यानंतर जडेजाला मिठी मारल्यानंतर मात्र...

IPL 2023 CSK Winner : तेव्हा धोनीच्या डोळ्यांत आले अश्रू...फायनल शॉटनंतर जडेजाला मिठी मारताना भावूक झाला माही ! पहा video
| Updated on: May 30, 2023 | 5:14 PM
Share

अहमदाबाद : आयपीएल 2023 मधील फायनल (IPl Final 2023) सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह सीएसके संघाने आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळेस विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला आहे. अटीतटीच्या या मॅचकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. जडेजा बॅटिंग करत असताना सर्वजण प्रार्थना करत होते. मात्र कॅप्टन कूल धोनी (Dhoni)नेहमीप्रमाणे शांत दिसत होता. मॅचमध्ये काय चाललंय हे तो फक्त शांतपणे बघत होता.

अखेरच्या चेंडूवर जडेजाने जेव्हा चौकार लगावला तेव्हा चेन्नईचे सर्व खेळाडू जिंकल्याचा जल्लोष करत होते. हसत-हसत एकमेकांना मिठ्या मारत होते. जडेजाडी धावत-धावत आपल्या सर्व सहकाऱ्यांकडे आला. तेव्हाही धोनी शांत होता. त्याने फार प्रतिक्रिया दिली. त्याचं फक्त जडेजाकडे लक्ष होतं. त्या दोघांच्याही आजूबाजूला गर्दी होती, सहकाऱ्यांच्या जल्लोषाला उधाण आलं होतं. पण एवढ्या सगळ्यातूनही जडेजाने वाट काढली आणि धोनीला येऊन मिठी मारली. धोनीनेही त्याला उचलून घेतलं. तोपर्यंत निर्विकार असलेला धोनी जडेजाने मिठी मारताच भावनिक झाला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने डोळे घट्ट मिटून घेतले आणि क्षणार्धात भावना आवरल्या. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून हजारोंनी तो लाईक केला आहे.

नेहमी कूल असणारा, आपल्या भावनांचे प्रदर्शन न करणारा धोनीही इमोशनल होऊ शकतो, हे या व्हिडीओतून दिसून आलं आहे.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन) : ऋद्धिमान साहा (W), शुबमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (C), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन) : ऋुतुराज गायकवाड़, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनी (कप्तान, विकेटकीपर), दीपक चाहर, मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा

अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ.
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे.
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी.
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात.
अजितदादा पर्व संपले... तडफदार आणि झंझावाती नेतृत्व अनंतात विलीन
अजितदादा पर्व संपले... तडफदार आणि झंझावाती नेतृत्व अनंतात विलीन.
अजित पवार पंचतत्वात विलीन, दोन्ही मुलांकडून मुखाग्नी
अजित पवार पंचतत्वात विलीन, दोन्ही मुलांकडून मुखाग्नी.
नितीन गडकरी यांनी घेतलं अजितदादांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन
नितीन गडकरी यांनी घेतलं अजितदादांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन.