क्रिकेटचा देव घडवणारे रमाकांत आचरेकर काळाच्या पडद्याआड

मुंबई: क्रिकेट जगताला देव देणारे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांचं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. रमाकांत आचरेकर सरांच्या तालमीत सचिन तेंडुलकरसह अनेक हिरे घडले. यामध्ये विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. आचरेकर सरांच्या निधनाने क्रिकेट विश्वातील द्रोणाचार्य हरपल्याची भावना आहे. रमाकांत विठ्ठल आचरेकर यांचा जन्म मालवणमध्ये 1932 …

क्रिकेटचा देव घडवणारे रमाकांत आचरेकर काळाच्या पडद्याआड

मुंबई: क्रिकेट जगताला देव देणारे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांचं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. रमाकांत आचरेकर सरांच्या तालमीत सचिन तेंडुलकरसह अनेक हिरे घडले. यामध्ये विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. आचरेकर सरांच्या निधनाने क्रिकेट विश्वातील द्रोणाचार्य हरपल्याची भावना आहे.

रमाकांत विठ्ठल आचरेकर यांचा जन्म मालवणमध्ये 1932 मध्ये झाला. दादरमधील शिवाजी पार्कात त्यांनी क्रिकेटमधील दिग्गजांना धडे दिले. पुढे याच खेळाडूंनी भारतीय संघात प्रवेश करुन जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केला.

आचरेकर सरांनी 1945 मध्ये न्यू हिंद स्पोर्ट्स क्लबकडून क्लब क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. यंग महाराष्ट्रा एकादश, गुल मोहर मिल्स आणि मुंबई पोर्ट संघांचे प्रतिनिधित्व त्यांनी केलं होतं. त्यांनी केवळ एक प्रथम श्रेणी सामना खेळला. 1963-64 साली त्यांनी ऑल इंडिया स्टेट बँकचे प्रतिनिधित्व करताना हैदराबादविरुद्ध सामना खेळला होता.

31 ऑक्टोबर रोजीच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी आचरेकर सरांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. प्रत्येक कामगिरीच्या वेळी सचिन तेंडुलकर आचरेकर सरांच्या आशीर्वादासाठी जात असे. यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यानंतरही त्याने आपल्या गुरुला सर्वोच्च सन्मान दिला.

खेळाडूंच्या फॅक्टरीचे निर्माते

रमाकांत आचरेकर सर यांना खेळाडूंच्या फॅक्टरीचे निर्माते म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आयुष्याची अनेक वर्ष त्यांनी क्रिकेटच्या मैदानात घालवली. दादरमधील शिवाजी पार्क हेच त्यांचं कार्यक्षेत्र होतं. शिवाजी पार्कात क्रिकेटर घडवून त्यांनी जागतिक क्रिकेटचं लक्ष वेधून घेतलं.

आचरेकर सर हे उत्तम प्रशिक्षक होतेच, शिवाय त्यांनी मुंबई क्रिकेट संघाच्या  निवड समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं. 2010 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं.

आचरेकर सरांना मिळालेले पुरस्कार

रमाकांत आचरेकर यांना 1990 मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आलं.

2010 मध्ये तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते 7 एप्रिल 2010 रोजी त्यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला.

2010 मध्येच त्यांना भारतीय संघाचे तत्कालिन प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार मिळाला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *