IPL 2019: ड्वेन ब्रावोच्या हातात बॅट-बॉल सोडून वस्‍तरा-कात्री

IPL 2019: ड्वेन ब्रावोच्या हातात बॅट-बॉल सोडून वस्‍तरा-कात्री


मुंबई : चेन्‍नई सुपर किंग्जचा (सीएसके) ऑलराउंडर ड्वेन ब्रावो दुखापत झाल्याने 2 आठवडे आयपीएल खेळू शकणार नाही. मात्र, ब्रावो संघातील खेळाडूंसह चांगला मौज-मस्ती करत इतर खेळाडूंना मदत करताना पाहायला मिळत आहे. सीएसकेच्या इंस्‍टाग्राम अकाउंटवर आज ब्रावोचे काही फोटो टाकण्यात आले. त्यात ब्रावो सहकारी खेळाडू मोनू सिंहचे केस कापताना आणि दाढी सेट करताना दिसत आहे.


ब्रावोने मोनू सिंहचा अगदी चेहरामोहराच बदलून टाकला आहे. त्याने मोनूचे केस कापताना दाढीलाही वेगळ्या पद्धतीने सेट केले. यानंतर दोघांनी सेल्‍फीही घेतला. सीएसकेच्या अकाउंटवर टाकलेल्या या फोटोला फॅन्सकडून चांगलीच दाद मिळत आहे. काही वेळेतच या पोस्‍टने 92 हजार लाइक्सचा टप्पा पार केला. सीएसकेचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने या फोटोवर कमेंट करत मोनू सिंह‍चा नवा लुक शानदार असल्याचे म्हटले.

 

View this post on Instagram

 

When Champion gave Monu Singh a new #Thala! #5000Increment #Kashmonu #WhistlePodu #Yellove ?? @djbravo47 @monu_singh31

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl) on

मोनू सिंह झारखंडचा क्रिकेटर आहे. तो मागील 2 हंगामात सीएसकेसोबत आहे. असे असले तरी त्याला अजून आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. दरम्यान, चेन्‍नई सुपरकिंग्‍स (सीएसके) संघाने आयपीएल 2019 मध्ये 5 पैकी 4 सामने जिंकून क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्‍नईने उत्तम कामगिरी केली आहे. त्यांना फक्त मुंबई इंडियन्सविरुद्धच्या एकाच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. चेन्नईचा पुढील सामना ‘होमग्राऊंड’वर कोलकाता नाइटरायडर्सशी होईल.

नाइटरायडर्सच्या संघाची कामगिरीही चेन्‍नईसारखीच राहिली आहे. त्यांना दिल्‍लीविरुद्ध खेळताना सुपर ओव्हरमध्ये पराभव पत्करावा लागला होता. बाकी अन्य सर्व सामने त्यांनी जिंकले आहे. त्यामुळे हा सामना चांगलाच रंगणार असल्याचे चित्र आहे.

पाहा व्हिडीओ:

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI