आईच्या निधनाचं वृत्त आलं, तरीही ‘हा’ खेळाडू मैदानावर दटून राहिला

आईच्या निधनाचं वृत्त आलं, तरीही 'हा' खेळाडू मैदानावर दटून राहिला

सेन्ट जोन्स : वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. हा सामना अँटीगुवामध्ये खेळवला जात आहे. यावेळी वेस्ट इंडीजने पहिला सामना जिंकल्यावर संघाने दुसऱ्या सामन्यावरही मजबूत पकड घेतली. मात्र संघासाठी तिसऱ्या दिवसाची सुरुवात खूप भावुक होती. वेस्ट इंडीजचा संघ तिसऱ्या दिवशी सामना जिंकण्यासाठी मेहनत घेत असताना, एक दु:खद बातमी समोर आली. बातमी अशी होती की, वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज अलजारी जोसेफच्या आईचे निधन झाले. या बातमीने वेस्ट इंडीजच्या खेळाडूंना धक्का बसला. जोसेफची आई मागील काही दिवस आजारी होती.

अशा दु:खद वेळीही जोसेफने सामन्यातून माघार न घेता संघासोबत खेळण्याचा निर्णय घेतला. आईच्या निधनानंतर दु:खी जोसेफ तिसऱ्या दिवशीच्या सामन्याआधी आपल्या सहकाऱ्यांसोबत वॉर्म अप करताना दिसला. या सामन्या दरम्यान त्याने फलंदाजीही केली. त्याने 20 चेंडू खेळत एका चौकारासह 7 धावाही केल्या आणि बेन स्टोक्सच्या चेंडूत तो बाद झाला. यावेळी दोन्ही संघाकडून जोसेफच्या आईला श्रद्धांजली वाहण्यात आली. दोन्ही संघ काळी पट्टी बांधून मैदानात उतरले.

“आज आम्हाला खूप दु:खद बातमी मिळाली. आमचा वेगवान गोलंदाज अलजारी जोसेफच्या आईचे निधन झाले आहे. आम्हाला माहित आहे की, अलजारी आणि त्याच्या कुटुंबासाठी ही वेळ खूप कठीण आणि दु:खदायक आहे. पण या दु:खामध्ये आम्ही त्यांच्या सोबत आहे”, असं विंडीज टीचे मॅनेजर रॉल लुईस यांनी सांगितले.

अलजारी जोसेफ 18 महिन्यानंतर कसोटी सामन्यात परतला आहे. यापूर्वी त्याच्या कंबरेला त्रास होत असल्याने तो क्रिकेटमधून बाहेर होता. आपल्या संघामध्ये परततत्याने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत त्याने पहिल्या कसोटी सामन्यात 5 विकेट आपल्या नावावर केले आहेत. अँटीगुवा कसोटीमध्ये इंग्लंडच्या पहिल्या डावात या गोलंदाजाने दोन विकेट आपल्या नावावर केले होते.

Published On - 11:11 am, Sun, 3 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI