70 वर्षांचा भारतीय क्रिकेटर, 28 वर्ष लहान नवरी…, वाढदिवसासाठी खास सरप्राईज तयार

Marriage Life : 70 वर्षाच्या भारतीय क्रिकेटरचं 28 वर्षीय लहान महिलेसोबत दुसरं लग्न, आता वाढदिवसासाठी तयार केलंय खास सरप्राईज..., सध्या सर्वत्र दोघांच्या खासगी आयुष्याची चर्चा..

70 वर्षांचा भारतीय क्रिकेटर, 28 वर्ष लहान नवरी..., वाढदिवसासाठी खास सरप्राईज तयार
फाईल फोटो
| Updated on: Aug 01, 2025 | 11:30 AM

Marriage Life : जेव्हा वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर आयुष्य काही काळासाठी थांबल्यासारखं वाटतं, तेव्हा एक खास व्यक्ती आयुष्य पुन्हा प्रकाशमय करण्यासाठी तयार असते. मग ती व्यक्ती कोणत्याही रुपात आयुष्यात येऊ शकते. बंगाल संघाचे माजी प्रशिक्षक अरुण लाल यांच्यासाठी, त्यांची पत्नी बुलबुल ही त्यांना प्रत्येक वळणावर साथ देणारी प्रकाश आहे. भारतासाठी 16 कसोटी आणि 13 एकदिवसीय सामने खेळलेले अरुण लाल यांचा आज वाढदिवस आहे. 1 ऑगस्ट 2025 रोजी ते 70 वर्षांचे होतील.

बुलबुल हिने सांगितल्यानुसार, 31 जुलै रोजी अरुण यांचा खरा वाढदिवस असते. पण कागदपत्रांवर 1 ऑगस्ट लिहिलं आहे त्यामुळे प्रत्येक वर्षी दोन वेळा त्यांचा वाढदिवस साजरा होतो. एक खासगी पद्धतीत, तर दुसरा संपूर्ण जगासमोर… यंदाच्या वर्षाचा वाढदिवस खास असणार आहे.

तीन वर्षांपूर्वी अरुण लाल आणि बुलबुल यांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर अनेकांनी त्यांच्या नात्याची टीका केली. दोघांचं नातं फार काळ टिकणार नाही… असं देखील अनेकांना वाटलं. पण दिवसागणिक त्यांचं नातं बहरत आहे… आज दोघे एकमेकांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत.

वाढदिवस असेल खास…

अरुण लाल यांच्या वाढदिवसाची पार्टी देखील खास असणार आहे. जवळपास 50 लोकं वाढदिवसासाठी बोलवण्यात आलं आहे. बुलबुल म्हणाली, ‘शुक्रवारी एक कॅटरिंग कंपनीकडे जबाबदारी सोपावण्यात आली आहे. काही जवळच्या व्यक्तींना बोलवण्यात आलं आहे. मित्र आणि वकील परितोष सिन्हा तसेच माजी क्रिकेटपटू आणि खासदार कीर्ती आझाद हे देखील उपस्थित राहतील. हा दिवस जवळच्या मित्रांसोबत साजरा केला जाईल. या कार्यक्रमासाठी सुमारे 50 लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. ‘

कुठे फिरण्याचा आहे प्लान…

या खास दिवसासाठी बुलबुलने एक मोठे सरप्राईज तयार केलं आहे. अरुण यांना खूप दिवसांपासून जपानला जायचं होतं, पण त्यांचं व्यस्त वेळापत्रक आणि जबाबदाऱ्यांमुळे जाता आलं नाही. आता बुलबुलने त्यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. ते दोघेही नोव्हेंबरमध्ये जपान येथे फिरायला जाणार आहेत.

भारतासाठी सुरुवात करणाऱ्या अरुण लाल यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांचा त्यांची पहिली पत्नी रीनापासून घटस्फोट झाला आहे. रीनाची तब्येत बिघडू लागली होती, त्यामुळे अरुण लाल यांनी तिच्या संमतीनंतरच दुसरे लग्न केलं. आता दुसऱ्या पत्नीसोबत अरुण लाल आनंदी आयुष्य जगत आहेत.