Virat Kohli : लेकीला सांगितलं कोहलीशी लग्न कर.. दिग्गज क्रिकेटर हे काय बोलून गेला ?
भारताचा नामवंत क्रिकेटर असलेला विराट कोहली हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याचा खेळ, स्टाईस, पर्सनॅलिटी यामुळे करोडो चाहते असून सोशल मीडियावरही त्याच्या पोस्ट्सवर लाईक्स कमेंट्सचा पाऊस पडत असतो. मोठमोठे क्रिकेटरही त्याचे चाहते आहेत, एक माजी, दिग्गज क्रिकेटर तर विराटमुळे एवढा प्रभावित झाला की त्याने थेट त्याच्या लेकीला विराटशी लग्न करण्यास सांगितलं होतं.

आजच्या घडीला जागतिक क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा दर्जा इतर कोणापेक्षाही कमी नाही. टीम इंडियाच्या या स्टार फलंदाजाने त्याच्या उत्कृष्ट फलंदाजी, विक्रम आणि कर्णधारपदाने केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याचे कोट्यावधी चाहते असून नियमितपणे ते क्रिकेटरला फॉलो करत असतात. मात्र फक्त सर्वसामान्य क्रिकेटप्रेमीच नव्हे तर जगातील अनेक माजी, दिग्गज खेळाडूंना देखील विराट खूप आवडतो. विशेषत: ऑस्ट्रेलियामध्ये तर विराटच्या चाहत्यांची कमी नाही. त्यापैकीएच एक म्हणजे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार, माजी खेळाडू, मार्क टेलर हा विराटमुळे एवढा प्रभावित झाला होता की त्याने थेट त्याच्या लेकीला विराटशी लग्न करण्याचा सल्ला दिली होता.
मार्क टेलरला पडली विराटाची भुरळ
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची कर्णधार एलिसा हिलीच्या पॉडकास्ट ‘विलो टॉक’ च्या एका भागात मार्क टेलरने हा धक्कादायक पण मजेदार खुलासा केला. 1996 सालच्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार राहिलेला मार्क टेलर म्हणाला, जेव्हा मी पहिल्यांदा कोहलीला भेटलो तेव्हाच खूप प्रभावित झालो होती. आणि त्यानंतरच मी माझ्या लेकीला त्याच्याशी लग्न करण्यास सांगितलं होतं.
या पॉडकास्टमध्ये जेव्हा विराट कोहलीचा उल्लेख करण्यात आला तेव्हा मार्क टेलर म्हणाला की तो कोहलीमुळे खूप प्रभावित झाला होा. माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराने 2014 च्या टीम इंडियाच्या दौऱ्याचा उल्लेख केला, जेव्हा कोहलीने पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवले होते. टेलरने त्या मालिकेतील एक प्रसंग सांगितला, की तेव्हा तो पहिल्यांदाच कोहलीची मुलाखत घेत होता पण अचानक मुलाखत मध्येच थांबवावी लागली. त्या वेळी जेव्हा टीम इंडियाचे मीडिया मॅनेजर कोहलीला परत बोलावण्यासाठी आले. तेव्हा कोहली म्हणाला की मी आधी मुलाखत पूर्ण करेन मगच परत जाईन.
Mark Taylor about Virat Kohli, he will never forget when a young Kohli showed him the upmost respect. pic.twitter.com/JN1Smy8TA7
— aaisha (@awkaaisha) June 15, 2025
कोहलीशी लग्न करण्याचा सल्ला ?
कोहलीने त्याच्याबद्दल आणि त्याच्या मुलाखतीबद्दल दाखवलेला इतका आदर पाहून मार्क टेलर खूप प्रभावित झाला. “विराट कोहलीचा तो फॉर्म मला नेहमीच लक्षात राहील. माझी मुलगी 17 वर्षांची असताना मी एकदा तिची कोहलीशी ओळख करून दिली आणि तिला सांगितले की जर तिला हवे असेल तर ती विराट कोहलीशी लग्न करू शकते. तेव्हा काही विराटचं लग्न झालं नव्हतं” असा मजेशील खुलासा टेलरने केला.
मार्क टेलरने हे कदाचित मस्करीत म्हटले असेल पण कोहलीबद्दल बोलायचं झालं तर, योगायोग असा की त्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यानच कोहलीचं अनुष्का शर्मासोबत नातं सुरू झालं. अखेर, या सुपर कपलने डिसेंबर 2017 साली लग्न केलं आणि तेव्हापासून, दोघेही संपूर्ण देशातील सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटी कपल बनले आहेत. कोहली आणि अनुष्काची मुलगी वामिका हिचा 2012 साली तर मुलगा अकाय याचा 2024 साली जन्म झाला.
