AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना कसला दिखावा, ना मोठेपणा…दिग्गज क्रिकेटपटूने केला चक्क मेट्रोतून प्रवास, साधेपणाचं कौतुक, Photo Viral

अनेकदा काही सेलिब्रिटी लोक रस्त्यावर असेच फिरताना किंवा मॅलमध्ये शॉपिंग करताना दिसतात. काही सेलिब्रिटी मेट्रो किंवा ट्रेनमध्ये प्रवास करतानाही दिसतात.

ना कसला दिखावा, ना मोठेपणा...दिग्गज क्रिकेटपटूने केला चक्क मेट्रोतून प्रवास, साधेपणाचं कौतुक, Photo Viral
| Updated on: Aug 30, 2026 | 6:29 PM
Share

अनेकदा काही सेलिब्रिटी लोक रस्त्यावर असेच फिरताना किंवा मॅलमध्ये शॉपिंग करताना दिसतात. काही सेलिब्रिटी मेट्रो किंवा ट्रेनमध्ये प्रवास करतानाही दिसतात. आता अशातच एक माजी दिग्गज क्रिकेटपटू जवागल श्रीनाथ अलीकडेच मेट्रोमधून प्रवास करताना दिसले. आता याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  हे फोटो पाहून लोकांनी त्यांच्या साधेपणाचे कौतुक केले आहे.

भारतीय क्रिकेटचे माजी दिग्गज खेळाडू जवागल श्रीनाथ अलीकडेच बंगळूरच्या ‘नम्मा मेट्रो’मध्ये एका सामान्य प्रवाशाप्रमाणे प्रवास करताना दिसले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.  निळ्या जीन्स आणि आकाशी रंगाचा शर्ट घातलेले जवागल श्रीनाथ, हातात ट्रॉली बॅग घेऊन मेट्रोच्या डब्यात शांतपणे उभे असलेले दिसले. ९० च्या दशकात आपल्या भेदक वेगवान गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांना चकित करणारा हा दिग्गज गोलंदाज आता सामान्य लोकांमध्ये इतक्या सहजतेने वावरतो की, तो भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांपैकी एक होता याचा कोणालाही अंदाज येणार नाही. त्याचा साधेपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

‘म्हैसूर एक्सप्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिग्गजाने अशा वेळी भारतीय वेगवान गोलंदाजीची सूत्रे हाती घेतली, जेव्हा देश एका प्रस्थापित वेगवान गोलंदाजीच्या शोधात होता. भारतासाठी ६७ कसोटी सामन्यांमध्ये २३६ आणि २२९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३१५ बळी घेणारा श्रीनाथ, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३०० हून अधिक बळी घेणारा एकमेव भारतीय वेगवान गोलंदाज आहे. पण निवृत्तीनंतर अनेक वर्षांनी, तो आता त्याच्या स्फोटक गोलंदाजी किंवा सामना जिंकून देणाऱ्या कामगिरीमुळे नव्हे, तर त्याच्या साध्या आणि सरळ स्वभावामुळे चर्चेत आहे.

सोशल मीडियावर चाहते श्रीनाथच्या विनम्र स्वभावाची उघडपणे प्रशंसा करत आहेत. अनेक युजरने राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि व्यंकटेश प्रसाद यांसारख्या दिग्गजांसह कर्नाटक क्रिकेटच्या एका संपूर्ण पिढीच्या साधेपणाची आठवण करून दिली. चाहत्यांचे म्हणणे आहे की, खेळातील प्रचंड प्रसिद्धीचा अर्थ नेहमीच ग्लॅमरस आयुष्य असा होत नाही आणि श्रीनाथ याचे उत्तम उदाहरण आहे.

Follow Us
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच...
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, युट्यूब चॅनलवर गुन्हा
Ritu Tawade | मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, बदनामी केल्या प्रकरणी युट्यूब चॅनलवर गुन्हा
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बोलणे टाळले;
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बोलणे टाळले; नेमकं कारण...
एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक...
Eknath Shinde Melava Rada | एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक...
अमराठी रिक्षा चालकांना मराठीसाठी वर्षभराची मुदत; शिवसेनेची नाराजी?
अमराठी रिक्षा चालकांना मराठीसाठी वर्षभराची मुदत; शिवसेनेची नाराजी? प्रताप सरनाईक म्हणाले ...
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान,
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय...
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?