Shreyas Iyer: पुन्हा वनडेच्या संघातून श्रेयस अय्यरला डच्चू? गंभीर-गिलचा नको तो हट्ट, म्हणे वनडे वर्ल्ड कपसाठी…
भारताचा कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे आता एक निर्णय घेण्याच्या तयारीत असून त्यामुळे मॅचविनर खेळाडूचे मोठे नुकसान होणार आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी फारसा वेळ उरलेला नाही. भारतीय संघाला यावेळी विजेतेपद पटकावण्यासाठी कोणतीही कसर सोडायची नाही. त्यामुळे, त्यांनी तयारी सुरू केली असून काही निर्णयही घेतले आहेत. अनेक नवीन खेळाडूची संघात एन्ट्री होईल अशी चिन्हे दिसत आहेत. आता अशा खेळाडूचा पत्ता कट होणार आहे जो नुकताच संघाच परतला होता. कर्णधार शुभमन गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या एका निर्णयामुळे पुन्हा एकदा मॅचविनरचे मोठे नुकसान होणार आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार तिलक वर्मा आता वनडे संघात स्थान मिळवणार आहे. तिलकला राखीव खेळाडू म्हणून ठेवणार आहेत, गरज भासल्यास श्रेयसच्या जागी तिलकलाही संघात स्थान दिले जाऊ शकते. तिलक डावखुरा फलंदाज आहेत आणि जर तो संघात सामील झाला, तर उजव्या हाताच्या फलंदाजांचे वर्चस्व असलेल्या फलंदाजीच्या क्रमात विविधता येईल. भारताच्या संघात पहिल्या तीन क्रमांकांमध्ये फक्त उजव्या हाताचे फलंदाज आहेत. या वृत्तात असेही म्हटले आहे की, तिलकला त्याच्या गोलंदाजीवर काम करण्यास सांगितले आहे, कारण व्यवस्थापनाला त्याच्या ऑफ-स्पिनमध्ये लक्षणीय प्रतिभा दिसते. संघाकडे वरच्या फळीत गरजेच्या वेळी उपयोगी पडतील असे पुरेसे गोलंदाजीचे पर्याय नाहीत. जर तिलकने योगदान दिले, तर ते फायदेशीर ठरेल.
या अहवालात बीसीसीआयच्या एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, “मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल यांना वाटते की, मधल्या फळीत संघाकडे पुरेसा पर्याय नाही. हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डी सतत दुखापतींनी त्रस्त आहेत. त्यामुळे, त्यांना असा खेळाडू हवा आहे जो एकदिवसीय सामन्यांमध्ये चार षटके गोलंदाजी करू शकेल.”
याच कारणास्तव, संघ व्यवस्थापनाने वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांनाही संधी दिली आहे. सूत्राने असेही म्हटले आहे की, व्यवस्थापनाला पर्याय म्हणून तरुण खेळाडूंची गरज आहे. संघाला दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीसाठी तयार राहावे लागेल. ऑस्ट्रेलियात खेळताना श्रेयस जखमी झाला होता. अलीकडे वेग आणि उसळीविरुद्ध त्याची परीक्षा झालेली नाही. संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या रूपाने आधीच दोन अनुभवी खेळाडू आहेत. विश्वचषक येईपर्यंत केएल राहुलही ३५ वर्षांचा होईल. जडेजाचे पुनरागमनही अनिश्चित आहे. तंदुरुस्तीच्या समस्यांमुळे संघाच्या क्षेत्ररक्षणातही अडचण येत आहे. संघ व्यवस्थापनाला वाटते की त्यांना राखीव खेळाडू म्हणून तरुण खेळाडूंची गरज आहे.”
