‘बॅटिंगवर लक्ष दे, ट्विटरवर नको…’, शहाणपण शिकवणाऱ्या फॅन्सना धोनीचं संयमी उत्तर, म्हणाला…

एम एस धोनी (MS Dhoni) ... भारतीय क्रिकेट कर्णधारांच्या यादीतलं एक असं नाव की ज्या कर्णधाराने भारताला अनेक ऐहिहासित क्षणांचा साक्षीदार होण्याची संधी दिली. (Former indian Captain MS Dhoni Tweet Viral On Social media)

'बॅटिंगवर लक्ष दे, ट्विटरवर नको...', शहाणपण शिकवणाऱ्या फॅन्सना धोनीचं संयमी उत्तर, म्हणाला...
एम एस धोनी
Akshay Adhav

|

Jun 01, 2021 | 8:49 AM

मुंबईएम एस धोनी (MS Dhoni) … भारतीय क्रिकेट कर्णधारांच्या यादीतलं एक असं नाव की ज्या कर्णधाराने भारताला अनेक ऐहिहासित क्षणांचा साक्षीदार होण्याची संधी दिली. मग 2007 चा टी ट्वेन्टी क्रिकेट वर्ल्डकपचं विजेतेपद, 2011 च्या एकदिवसीय विश्चषकाचं जेतेपद तर 2013 ला चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद… अशी कितीतरी पदकं, करंडक, सन्मान धोनीने भारताला मिळवून दिले. पण ज्यावेळी एखाद्या खेळाडूचा खराब फॉर्म सुरु असतो त्यावेळी त्यांना फॅन्सच्या रोषाला सामोरं जावं लागतं. नऊ वर्षांपूर्वी असंच एका  क्रिकेट फॅन्सनी धोनीला अक्कल शिकवली तेव्हा धोनीने त्याला अतिशय संयमी उत्तर दिलं, तेच ट्विट आता व्हायरल होतंय……! (Former indian Captain MS Dhoni Tweet Viral On Social media)

‘ट्विटरवर लक्ष देण्यापेक्षा तू बॅटिंगवर अधिक लक्ष दे’

महेंद्रसिंग धोनीचा नऊ वर्षांपूर्वीचं एक ट्विट व्हायरल होतंय, 2012 मध्ये एका फॅन्सने महेंद्रसिंग धोनीला बॅटिंग वर लक्ष दे, असं शहाणपण शिकवलं. फॅन्सच्या या अति शहाणपणाच्या सल्ल्यावर महेंद्रसिंग धोनीने त्याला तितकीच संयमी उत्तर दिलं. धोनीकडे त्यावेळी 2012 ला श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाची जबाबदारी होती. ‘ट्विटरवर लक्ष देण्यापेक्षा तू बॅटिंगवर अधिक लक्ष दे’ असा शहाणपणा एका क्रिकेट फॅन्सने धोनीला शिकवला होता.

धोनीचं तितकंच संयमी उत्तर

फॅन्सच्या अति शहाणपणाच्या सल्ल्याला धोनीने अतिशय संयमीपणे उत्तर दिलं. धोनीच्या उत्तराने ट्विटरवर एक मैफिल रंगली होती. धोनीने म्हटलं, “सर मला काही टिप्स द्याल का…?’ आता धोनीचं याच उत्तराचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या आयपीएल स्थगित झाल्यामुळे धोनी आपल्या रांचीतल्या घरी आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. तिकडे सोशल मीडियावर मात्र नऊ वर्षांपूर्वी धोनीचं एक ट्विट व्हायरल झाल्याने धोनीच्‍या संयमी आणि सुसंस्कृत स्वभावाची अनेक चाहते तारीख करताना दिसून येत आहेत.

धोनीच्या नेतृत्वाखालील संघाचा विजयरथ

एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसीच्या सगळ्या करंडकावर आपला हक्क सांगितला. ज्यामध्ये 2007 साली खेळलेला टी ट्वेन्टी वर्ल्ड कप, 2011 साली खेळलेला एकदिवसीय वर्ल्ड कप, 2013 साठी खेळलेली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी तसंच आयसीसी टेस्ट गदा या सगळ्या स्पर्धांचा समावेश आहे. या तिन्ही स्पर्धांमध्ये एम एस धोनीचे लाजवाब नेतृत्व भारतीय संघाच्या विजयाला कारणीभूत होतं.

(Former indian Captain MS Dhoni Tweet Viral On Social media)

हे ही वाचा :

‘नीले गगन के तले’, संजना गणेशनच्या थ्रो बॅक फोटोने फॅन्सना भुरळ

भल्याभल्यांना जमली नाही ती कामगिरी जेम्स अँडरसन करणार, सचिन तेंडुलकरचा ‘तो’ रेकॉर्ड तोडणार?

WTC Final : भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅचमध्ये कोण वरचढ ठरणार?, ब्रँडन मॅक्यूलमचा मोठा दावा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें