5

आयर्लंडचे माजी दिग्गज क्रिकेटपटू रॉय टोरेंस यांचं 72 व्या वर्षी निधन

या दिग्गज खेळाडूच्या निधनामुळे क्रिकेटविश्वातून शोक व्यक्त केला जात आहे.

आयर्लंडचे माजी दिग्गज क्रिकेटपटू रॉय टोरेंस यांचं 72 व्या वर्षी निधन
आयर्लंडचे माजी क्रिकेटपटू रॉय टेरेन्स यांचं वयाच्या 72 वर्षी निधन
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 4:11 PM

डबलिन : आयर्लंड क्रिकेट टीमसाठी (Ireland cricket) एक वाईट बातमी आहे. आयर्लंडचे माजी क्रिकेटपटू रॉय टेरेन्स यांचं वयाच्या 72 वर्षी निधन (Ireland cricketer Roy Torrance passed away) झालं आहे. क्रिकेट आयर्लंडने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. टेरेन्स यांच्या निधनामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे क्रिकेटविश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. टेरेन्स यांच्या मृत्यूमुळे आयर्लंड क्रिकेट टीमचं मोठं नुकसान झालं आहे. (Former Ireland cricketer Roy Torrance passed away age of 72)

रॉय टॉरेंस हे अष्टपैलू खेळाडू होते. रॉय यांनी 1966 मध्ये मिडिलसेक्सविरुद्ध पहिला सामना खेळला होता. त्यांची क्रिकेट कारकिर्द एकूण 18 वर्षांची होती. 1966 ते 1984 दरम्यान त्यांनी एकूण 30 सामन्यांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलं. यामध्ये त्यांनी 25.6 च्या सरासरीने 77 विकेट्स घेतल्या होत्या.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी आयर्लंड क्रिकेट मंडळात अनेक पदं भूषवली. 2000 मध्ये त्यांची आयर्लंड क्रिकेट बोर्डाच्या अध्ययक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर 2004 मध्ये त्यांनी आयर्लंड क्रिकेट टीमच्या व्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली. रॉय यांनी 12 वर्ष अगदी यशस्वीरित्या ही जबाबदारी पार पाडली. क्रिकेटमधील अमूल्य योगदानासाठी त्यांचा 2009 मध्ये सत्कार करण्यात आला होता.

दरम्यान सध्या यूएईमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका खेळण्यात येत आहे. या मालिकेत आयर्लंड 1-0 ने पिछाडीवर आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज (24 जानेवारी) खेळण्यात येत आहे. तर तिसरा आणि शेवटचा सामना 26 जानेवारीला अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहे.

असा आहे आयर्लंडचा संघ :

पॉल स्टर्लिंग, केव्हिन ओ ब्रायन, अँड्रयू बाल्बर्नी (कर्णधार), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, लॉरकन टकर (विकेटकीपर), गॅरेथ डेलनी, सिमी सिंग, अँडी मॅकब्रिन, बॅरी मॅककार्थी आणि क्रेग यंग.

संबंधित बातम्या :

#INDvsENG | टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंड संघाची घोषणा

England Tour India | इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणे की विराट कोहली, कर्णधार कोण?

Dean Jones | IPL कॉमेंट्रीसाठी मुंबईत, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचा मृत्यू

(Former Ireland cricketer Roy Torrance passed away age of 72)

Non Stop LIVE Update
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?