AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्वा, याला म्हणतात नशीब! जेलमधून सुटला, फुटबॉलर बनला; आता थेट देशाचा ‘राजा’ होणार, एका रात्रीत खेळाडूचं जीवन बदललं

George Desmond Footballer King News : लंडनमध्ये फुटबॉल खेळणाऱ्या जॉर्ज डेसमंड कामुरासीची गोष्ट एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. नवव्या स्तरावरील फुटबॉल क्लब एसई डॉन्सचा गोलकीपर आणि कर्णधार असलेल्या जॉर्जची टोरो राज्याचा पुढचा ओमुकामा म्हणजेच राजा म्हणून निवड करण्यात आली आहे.

व्वा, याला म्हणतात नशीब! जेलमधून सुटला, फुटबॉलर बनला; आता थेट देशाचा 'राजा' होणार, एका रात्रीत खेळाडूचं जीवन बदललं
George Desmond Footballer King (Photo : Instagram)Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 08, 2026 | 9:56 PM
Share

एक फुटबॉलर आता राजा बनणार आहे. एका अगदी लहान क्लबकडून खेळणारा जॉर्ज डेसमंड हा आता टोरो जमातीचा राजा बनणार आहे. टोरो राज्याच्या राज्याधिकार समितीने जॉर्जला पुढचा ओमुकामा म्हणजेच राजा बनवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 18 पैकी 15 सदस्यांनी जॉर्जला कामुरासीच्या बाजूने मतदान केलं आहे. दरम्यान जॉर्ज हा लंडनमधील एका नॉन फुटबॉल क्लबचा गोलकीपर आहे. तो बिग जी या नावानेही ओळखला जातो. तसेच तो साऊथ ईस्ट लंडन क्लब एसई डॉन्सचा कर्णधारही आहे. हा क्लब देशांतर्गत फुटबॉलच्या क्रमवारीत नवव्या ठिकाणी पोहोचला आहे.

दरम्यान, दुसरीकडे डेसमंड कामुरासी हा दिवंगत राजा ओयो न्यिम्बा काबाम्बा इगरु रुकुडी यांचा चुलत भाऊ आहे. त्याचे आजोबाही जॉर्ज रुकुडीही राजे होते आहेत. परंतु आता कामुरासी यांना युगांडाला परत यायचे नाही किंवा राजा व्हायचं नाही त्याला आपल्या पत्नी आणि मुलांसोबत लंडनमध्येच राहायचे आहे, अशीही माहिती समोर आली आहे. त्यामुळेही ही संधी जॉर्जकडे गेल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, कामुरासीच्या आयुष्याची गोष्ट एखाद्या चित्रपटापेक्षा काही कमी नाही. त्याने एका मुलाखतीमध्ये सगळ्या प्रवासाबद्दल मनमोकळा संवाद साधला होता. त्याने सांगितलं की मी वयाच्या 14 व्या वर्षी प्रचंड वाईट लोकांच्या संपर्कात आलो होतो. आई सोडून गेल्यानंतर खूप बदल झाला, ज्यामुळे तुरुंगवासही भोगावा लागला. आपण खूप चुकीचं वागत असल्याची जाणीव त्याला तुरुंगातच झाली. जेव्हा तो आपल्या तुरुंगातून बाहे आला, तेव्हा त्याने स्वतःला स्वतःला फुटबॉलमध्ये झोकून दिले.

6 फूट 9 इंच उंच असलेल्या या खेळाडूची निवड नायकी अकादमीमध्ये झाली. या अकादमीमध्ये त्याला पेप गार्डिओला यांच्या मार्गदर्शनासाठी बार्सिलोनासाठी खेळण्याची संधी मिळाली. आता याच खेळाडूला त्यांचा राजा म्हणून निवडण्यात आले आहे, पण कामुरासी ही ऑफर स्वीकारतो की नाही हे अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे आता पुढे काय होणार, जॉर्ज राजा बनणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?