FIFA :ऐतिहासिक विजयानंतर सरकारी सुट्टी, रस्त्यावर थिरकले सौदी अरेबियाचे चाहते

| Updated on: Nov 24, 2022 | 8:31 AM

सरकारी सुट्टी, रस्त्यावर डान्स... अशा प्रकारे सौदी अरेबियाने अर्जेंटिनावरचा विजय उत्साहात साजरा केला

FIFA :ऐतिहासिक विजयानंतर सरकारी सुट्टी, रस्त्यावर थिरकले सौदी अरेबियाचे चाहते
FIFA World Cup 2022
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : सौदी अरेबियात (Saudi Arabia) विजयानंतर तिथल्या सरकारने नागरिकांना जल्लोष साजरा करण्यासाठी एक दिवस सरकारी सुट्टी (Government holiday) जाहीर केली होती. काल सौदी अरेबियाच्या चाहत्यांनी रस्त्यावर उतरून आपला आनंद साजरा केला, त्याचे सोशल मीडियावर (Social Media)अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे. अर्जेंटीना ही टीम जगातील एक तगडी टीम मानली जाते. परंतु सौदी अरेबिया टीममधील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आणि 2-1 अशा फरकाने विजय मिळविला.

ज्यावेळी ऐतिहासिक विजय झाला, त्यावेळी सौदी अरेबियाचे प्रमुख सलमान बिन अब्दुल अझीझ यांनी मोठी घोषणा केली. म्हणजे मॅचच्या दुसऱ्या दिवशी सौदी अरेबियात सरकारी सु्ट्टी देण्यात आली. संपुर्ण देश एकाचवेळी आनंद साजरा करेल यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली.

सध्या कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत रोज रंगत पाहायला मिळत आहे. जिथं मॅच झाली, त्या मैदानात सुद्धा चाहत्यांनी जोरदार जल्लोष केला. मॅच संपल्यानंतर सुध्दा बराचवेळ चाहते स्टेडियमच्या बाहेर चाहते तासनतास सेलिब्रेशन करीत होते.

एका मोठ्या बलाढ्य टीमचा पराभव केल्यामुळे सौदी अरेबियात लोकं रस्त्यावर उतरुन नाचत आनंद साजरा करीत होते. छोट्या शहरांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत चाहत्यांनी आनंद साजरा केला.