Vikram Gokhale: “विक्रम गोखले यांच्या निधनाचं वृत्त खोटं”; पत्नी वृषाली यांनी दिली प्रकृतीविषयीची माहिती

विक्रम गोखले यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट; निधनाच्या अफवांवर पत्नीची प्रतिक्रिया

Vikram Gokhale: विक्रम गोखले यांच्या निधनाचं वृत्त खोटं; पत्नी वृषाली यांनी दिली प्रकृतीविषयीची माहिती
Vikram GokhaleImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 7:53 AM

पुणे: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक आहे. बुधवारी संध्याकाळपासून त्यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. त्यावर आता त्यांची पत्नी वृषाली गोखले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “बुधवारी दुपारी ते कोमात गेले आणि तेव्हापासून ते स्पर्शाला प्रतिसाद देत नाहीयेत. ते व्हेंटिलेटरवर आहेत. पुढे काय करायचं हे सकाळी डॉक्टर ठरवतील. त्यांची प्रकृती सुधारतेय का, ते प्रतिसाद देत आहेत का, यावरून डॉक्टर पुढील निर्णय घेतील”, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

विक्रम गोखले हे 5 नोव्हेंबरपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल असल्याचंही त्यांनी सांगितलं. “त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र आता पुन्हा ती बिघडली. हृदयाशी आणि किडनीशी संबंधित समस्या त्यांना जाणवत आहेत. त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे”, असं वृषाली गोखले यांनी सांगितलं. विक्रम गोखले यांची एक मुलगी परदेशी राहते. ती सॅन फ्रान्सिस्कोहून पुण्याला परतली आहे. तर दुसरी मुलगीही सध्या पुण्यातच आहे.

विक्रम गोखले यांनी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपट अशा सर्व व्यासपीठांवर आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. रंगभूमीवर त्यांनी एक मोठा काळ गाजवला आहे. 2016 मध्ये त्यांनी घशाच्या त्रासामुळे नाटकातून संन्यास घेतला होता.

हे सुद्धा वाचा

विक्रम गोखले यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमावलं. याच महिन्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या शूटिंगच्या आधीही ते रुग्णालयात दाखल होते. डिस्चार्ज मिळताच त्यांनी शूटिंगला सुरुवात केली होती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.