Dinesh Karthik : दिनेश कार्तिकला महेंद्रसिंग धोनीने दिला होता सल्ला, त्याचा आजही त्याला फायदा होतो

टी-20 पहिले अर्धशतक झळकावणारा दिनेश कार्तिक सामना संपल्यानंतर मैदानावर बसला आणि हार्दिक पांड्या त्याची मुलाखत घेतली. त्यावेळी तिथं अनेक गोष्टींचा उलघडा झाला. सध्या सुरू असलेल्या मालिकेत पांड्या भारतीय संघाचा उपकर्णधार आहे.

Dinesh Karthik : दिनेश कार्तिकला महेंद्रसिंग धोनीने दिला होता सल्ला, त्याचा आजही त्याला फायदा होतो
मुलाखतीदरम्यान हार्दिकने त्याच्या मानसिकतेबद्दल कार्तिकला प्रश्न विचारलाImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 8:50 AM

मुंबई – राजकोट (Rajkot) येथे चौथ्या टी20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 82 धावांनी विजय मिळविला. मॅचमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यानंतर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) सामनावीर दिनेश कार्तिकशी (Dinesh Karthik) संवाद साधला. त्यावेळी माजी कर्णधार एमएस धोनीला बाबत दिनेश कार्तिक म्हणाला की, स्वत:च्या खेळापेक्षा संघाला काय अपेक्षित आहे, यावर लक्ष केंद्रीत करायला हवे असं सांगितलं. दोघांच्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. “माझ्या सुरुवातीच्या काळात मी माही भाईला एक प्रश्न विचारला होता. मी त्याला विचारले की तो दबावाच्या काळात कसा खेळतो. त्यावेळी त्याने मला एक साधा सल्ला दिला होता. तुमच्या स्वतःच्या स्कोअरबद्दल विचार करणे थांबवा आणि तुमच्या संघाला काय हवे आहे याचा विचार करा’. अगदी सुरुवातीपासूनच, हा धडा माझ्या मनात अडकला आहे. मी आता ज्या प्रकारचा खेळाडू आहे ते बनण्यास मला मदत केली” असल्याचे कार्तिकने सांगितले.

मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

टी-20 पहिले अर्धशतक झळकावणारा दिनेश कार्तिक सामना संपल्यानंतर मैदानावर बसला आणि हार्दिक पांड्या त्याची मुलाखत घेतली. त्यावेळी तिथं अनेक गोष्टींचा उलघडा झाला. सध्या सुरू असलेल्या मालिकेत पांड्या भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर या दोन क्रिकेटपटूंच्या संभाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. मुलाखतीदरम्यान हार्दिकने कार्तिकला त्याची अर्धशतकी खेळी आणि भारतीय संघात पुनरागमन करण्याबाबत अनेक प्रश्न विचारले आहेत.

फलंदाजी करताना मानसिकता असते?

मुलाखतीदरम्यान हार्दिकने त्याच्या मानसिकतेबद्दल कार्तिकला प्रश्न विचारला. त्यावेळी कार्तिक म्हणाला, ‘मध्यम फळीतील फलंदाजाला परिस्थितीनुसार वेगवेगळ्या वेळेला वेगळ्यावेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. तुम्ही कोणाला टार्गेट करता आणि तुमचा डाव कसा पुढे कसा न्यायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे. मॅच रंगात आल्यानंतर मला कळलं की पुढे काय करायचं? ही एक महत्त्वाची भागीदारी होती. मालिकेत 1-2 अशी घसरण झाल्यानंतर बरोबरीत येणे खूप महत्त्वाचे होते असं कार्तिक म्हणाला.

तसेच मी माझ्या खेळीचा आनंद लुटला आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.