AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishabh Pant | भल्या भल्या खेळाडूंना आपल्या कारकिर्दीत करता आलं नाही ते पंतने केलं, दिग्गज खेळाडूकडून कौतुक

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयन चॅपल (Ian Chappell) यांनी रिषभ पंतचे (Rishabh Pant) कौतुक केलं आहे.

Rishabh Pant | भल्या भल्या खेळाडूंना आपल्या कारकिर्दीत करता आलं नाही ते पंतने केलं, दिग्गज खेळाडूकडून कौतुक
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयन चॅपल (Ian Chappell) यांनी रिषभ पंतचे (Rishabh Pant) कौतुक केलं आहे.
| Edited By: | Updated on: Mar 15, 2021 | 7:03 AM
Share

मुंबई :रिषभ पंत (Rishabh Pant) कोणालाही घाबरत नाही. तो निडर आहे. तो बिंधास्त खेळतो. पंत आत्मविश्वासाने भरलेला आहे. तो नेहमीच प्रत्येक डावात आक्रमकता आणि सावधपणा यात योग्य संतुलन राखतोय. चेंडूची दिशा पाहून फटका मारणं ही सर्वसाधारण बाब आहे. पण पंत नेहमीच धावा काढण्याची संधी शोधत असतो. पंतने इंग्लंड विरुद्धच्या 3 डावात जबरदस्त खेळला. त्याच्या या खेळीने सामन्याचं सर्व चित्र पालटलं. टीम इंडिया अडचणीत असताना पंतने ही शानदार कामगिरी केली. निर्णायक क्षणी अशी कामगिरी प्रत्येकाला आपल्या कारकिर्दीत करता येत नाही”, असं म्हणत ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयन चॅपल (ian chappell) यांनी पंतचं कौतुक केलं आहे. त्यांनी इसपीएन क्रिकइंफोमधील आपल्या सदरात पंतवर लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी वरील उल्लेख केला आहे. (Ian Chappell praised Rishabh Pant)

विकेटकीपिंगमध्ये सुधारणा

“पंतवर विकेटकीपिंगवरुन जोरदार टीका करण्यात आली. पण त्याने 4 कसोटी सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली. पंत फलंदाजी चांगली करतोय. त्यासोबतच फिरकी गोलंदाजांच्या बोलिंगवर तो चांगली किपींग करतोय. त्याच्या किपींगमध्ये सुधारणा झाली आहे. पंतने आपल्या खेळीत चांगली प्रगती केलीय”, असंही चॅपल यांनी म्हटलं.

2021 मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय

रिषभने या 2021 वर्षात आतापर्यंत सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरोधातील कसोटी मालिकेतही अफतालून परफॉरमन्स केला होता. पंत टीम इंडियाकडून कसोटीमध्ये 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. पंतने या वर्षात आतापर्यंत एकूण 515 धावा केल्या आहेत. तर यादीत तिसऱ्या क्रमांकावर हिटमॅन रोहित शर्मा आहे. रोहितनेही 474 धावा केल्या आहेत.

संबंधित बातम्या :

Rishabh Pant | पंत म्हणजे डावखुरा सेहवाग, रिषभच्या आक्रमक फलंदाजीचा दिग्गज क्रिकेटपटू दिवाना

Video | कीपिंग करताना स्टंपमागे तु फार बडबडतोस, रोहितच्या प्रश्नावर रिषभ काय म्हणाला?

India vs England 2nd T 20I | विराट फॉर्ममध्ये परतला, पण त्यासाठी कुणाचा कानमंत्र कामी आला? ऐका खुद्द चॅम्पियन काय म्हणतोय?

(Ian Chappell praised Rishabh Pant)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.