
गट अ मध्ये भारत आणि न्यूझीलंडच्या सामन्याच्या सुरुवातीलाच टीम इंडियाला दोन मोठे धक्के बसले. शुभमन गिलनंतर रोहित शर्मा तंबूत परतला. त्यामुळे भारतीय चाहते टेन्शनमध्ये सापडले आहे. त्यातच समाज माध्यामावर या जादूगार पोपटाच्या भविष्यवाणीची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर प्रीडिक्शन स्टार नावाच्या खात्यावर एका पोपटाने या सामन्याची भविष्यवाणी केली आहे. यापूर्वी या पोपटाने केलेली भविष्यवाणी खरी ठरली होती. त्यानंतर भारत -न्यूझीलंड सामन्यापूर्वीच त्याने कोणता संघ जिंकणार याचे भाकीत केले आहे.
कोणता संघ जिंकणार?
बांगलादेश आणि पाकिस्तान विरोधातील सामन्यात कोणता संघ जिंकणार याची भविष्यवाणी या पोपटाने केली होती. त्यावेळी सर्वांनी त्याची खिल्ली उडवली होती. पण बांगलादेशाने पारडे बदलवले आणि पोपटाचे भाकीत खरे ठरले. त्यानंतर अनेक जणांनी भारत-न्यूझीलंड सामन्यात काय होईल, याचा अंदाज व्यक्त केला. पण सगळ्यांचे लक्ष या जादूगार पोपटाकडे लागले आहे.
या व्हिडिओनुसार, पोपटाचा मालक, पिंजरा उघडतो आणि पोपट समोर असलेल्या चिठ्ठ्यांच्या गड्डीतून एक कार्ड उचलतो. त्यातील एक आवडती चिठ्ठी निवडल्याचे तो खुणावतो. त्यानंतर हे कार्ड तो मालक कॅमेऱ्यासमोर दाखवतो. या कार्डवर जिंकलेल्या देशाचा झेंडा असतो. भारत आणि न्यूझीलंडच्या सामन्यात सुद्धा हा पोपट अशीच कृती करतो. या कार्डवर भारताचा झेंडा दिसतो. म्हणजे या जादूगार पोपटाने भारताच्या विजयाचे भाकीत केले आहे.
भारताने यापूर्वीचे सामने दुबईतच खेळले आहे. हा भारताचा तिसरा सामना आहे. हा सामना सुद्धा दुबईतच सुरू आहे. न्यूझीलंड संघाने यापूर्वीचे दोन्ही सामने पाकिस्तानमध्ये खेळले आहेत. भारत आणि न्यूझीलंडने आतापर्यंत एक ही सामना हारलेला नाही. दोन्ही सामने त्यांनी खिशात घातले आहे. हे दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहचले आहेत. आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल, क्रमवारीत अव्वलस्थानी असेल.
यापूर्वी IIT वाल्या बाबांनी केलेली भविष्यवाणी त्यांच्या अंगलट आली होती. या बाबाने भारत-पाकिस्तान सामन्यात भारत हरणार असल्याचे भाकीत केले होते. पण बाबा तोंडघशी पडले. भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती. त्यानंतर अभयसिंह चांगलेच ट्रोल झाले होते.