
भारतीय टीमचा स्टार फलंदाज विराट कोहली नवीन इतिहास रचणार आहे. तो एक मोठा रेकॉर्ड त्याच्या नावावर नोंदवणार आहे. विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अखेरच्या सामन्यात विराट उतरातच त्याच्या नावावर महा विक्रम नोंदवला जाईल. हा रेकॉर्ड मोडणे अशक्यप्राय असेल. आता थोड्याच वेळात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होत आहे. दोन्ही संघ उपांत्यपूर्व सामन्यासाठी पात्र ठरले आहेत. हा सामना केवळ औपचारिकता म्हणून ते खेळतील. आज सामना जिंकणारा संघ हा क्रमवारीत सर्वात पुढे असेल.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील गट अ मध्ये भारत आणि न्यूझीलंडने उपांत्यपूर्व फेरीसाठी जागा तयार केली आहे. तर दुसऱ्या तंबूत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी गट ब मध्ये जागा निश्चित केली आहे. आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ एकही सामना हरलेले नाहीत. आजच्या सामन्यात आता कोण बाजी मारणार हे समोर येईल. जो संघ सामना जिंकेल तो क्रमवारीत अग्रेसर असेल.
कोहलीचा जागतिक विक्रम
ऑलराऊंडर विराट कोहली हा आणखी एक विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवण्यास सज्ज झाला आहे. न्यूझीलंडविरोधात तो मैदानात उतरताच तो 300 वनडे, 100 टेस्ट आणि 100 टी20 सामना खेळणारा पहिला खेळाडू होईल. विराट कोहली याने आतापर्यंत 299 वनडे, 123 कसोटी आणि 125 टी20 सामने खेळला आहे. 2008 मध्ये श्रीलंकेविरोधात वनडे सामन्यातून त्याची कारकीर्द सुरू झाली होती. 2010 मध्ये त्याने टीम इंडियात त्याची जागा पक्की केली होती. तेव्हापासून त्याची कारकीर्द बहरत गेली.
विराट याने 2012 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्याने 2013 मध्ये वनडेचे कर्णधार पद सांभाळले. तो टी20 चा पण कर्णधार झाला. विराटने 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरोधात कसोटी सामन्यातून पदार्पण केले होते. 2011/12 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात अखेरच्या दोन कसोटी सामन्यात तो खेळला होता. त्यानंतर टीम इंडियात त्याचे स्थान पक्के झाले. 68 सामन्यांपैकी 40 मध्ये त्याने विजयासह त्याने नशीब आजमावले. सर्वात वेगवान 10000 वनडे धाव करण्याचा मान सुद्धा त्याला मिळाला आहे.