AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC Champions Trophy 2025 : तो अंदाज ठरला खरा, भारताचा पाकिस्तानमध्ये न खेळण्याचा निर्णय योग्यच, सामन्यांवर दहशतवादी हल्ल्याचे सावट

ICC Champions Trophy 2025 : अखेर तो अंदाज खरा ठरला. भारतीचा पाकिस्तानमध्ये न खेळण्याचा निर्णय योग्य ठरला. पाकिस्तान हा धोकादायक देश असल्याचे पुन्हा एकदा समोर येत आहे. यापूर्वी श्रीलंका या देशाने तो अनुभव घेतला आहे. खेळाडूंची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

ICC Champions Trophy 2025 : तो अंदाज ठरला खरा, भारताचा पाकिस्तानमध्ये न खेळण्याचा निर्णय योग्यच, सामन्यांवर दहशतवादी हल्ल्याचे सावट
| Updated on: Feb 25, 2025 | 10:49 AM
Share

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत, पाकिस्तानला भारताविरोधीतील सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने एकच रोष आहे. तर दुसरीकडे यजमान देशालाच दहशतवादी हल्ल्याची भीती वाटत आहे. या टुर्नामेंटच्या सामन्यांवर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. खेळाडूंनाच पळवून नेण्याची भीती व्यक्त होत असल्याने आयसीसीचे सुद्धा धाबे दणाणले आहे. या ट्रॉफीत पाकिस्तानमध्ये न खेळण्याचा भारताचा निर्णय योग्य असल्याचे समोर येत आहे. इस्लामिक स्टेट खुरसान प्रदेश (ISKP) ही संघटना खेळाडूच नाही तर परदेशी नागरिकांचे अपहरण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपहरण केल्यानंतर त्या बदल्यात संघटना त्यांच्या मागण्या लादणार असल्याचा सुगावा पाकिस्तानी गुप्तहेर संघटनांना लागला आहे. या नवीन अलर्टमुळे सामना होत असलेल्या शहरात आणि स्टेडियमबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

नामुष्की टाळण्यासाठी तगडा बंदोबस्त

पाकिस्तानची स्थिती रामभरोसे आहे. येथे कोण, कुठून, केव्हा हल्ला करेल याची काहीची शाश्वती नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तालिबानसोबत पाकिस्तानचे संबंध ताणल्या गेले आहेत. तर या चिमुकल्या राष्ट्रात दोन स्वतंत्र देशाची मागणी जोर धरू लागली आहे. आता नामुष्की टाळण्यासाठी 13 हजार पोलीस आणि एका खेळाडूसाठी 100 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

या टुर्नामेंटमध्ये 8 संघ खेळत आहेत. त्यातील अनेक सामने हे कराची, रावळपिंडी आणि लाहोर येथील स्टेडियमवर होत आहे. तर अंतिम सामना कुठे खेळवायचा याविषयी निर्णय झालेला नाही. भारताचे सर्व सामने हे दुबईत होत आहे. स्थानिक मीडियानुसार, लाहोरमध्ये सुरक्षेसाठी 8 हजार तर रावलपिंडीमध्ये 5 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर पाकिस्तान लष्कर सुद्धा सुरक्षा पुरवत आहे.

यामध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रदेशातील 135 पोलीस निरीक्षक, 72 वरिष्ठ अधिकारी, 200 हून अधिक महिला पोलीस तर दहा हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी स्टेडियम परिसात तैनात आहेत. एका खेळाडूसाठी 100 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. नामुष्की टाळण्यासाठी पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणा जीवाचे रान करत आहेत.

श्रीलंकेला 2009 मध्येच चटके

वर्ष 2009 मध्ये श्रीलंकेचा संघ सामन्यासाठी पाकिस्तानमध्ये गेला होता. कसोटी सामन्यासाठी श्रीलंकेचा संघ हॉटेलमधून लाहोर स्टेडियमकडे जात असताना दहशतवाद्यांनी संघाच्या बसवर हल्ला केला होता. या हल्ल्यात श्रीलंकेचे 6 हून अधिक खेळाडू जखमी झाले होते. यामध्ये महेला जयवर्धने, कुमार संगकारा आणि चामिंडा वास यासारख्या स्टार खेळाडूंचा समावेश होता.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...