INDvsENG : मोहम्मद शमीचे 5 विकेट्स, भारताला विजयासाठी 338 धावांचे तगडं आव्हान

विश्वचषकात करो या मरो अशा स्थितीत असलेल्या इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 338 धावांचे तगडं आव्हान दिलं आहे. सलामीवीर जॉनी बेअरस्टोच्या 10 चौकार आणि 6 षटकारांच्या जोरावर यजमान इंग्लंडने 337 धावा ठोकल्या.

INDvsENG : मोहम्मद शमीचे 5 विकेट्स, भारताला विजयासाठी 338 धावांचे तगडं आव्हान

लंडन : विश्वचषकात करो या मरो अशा स्थितीत असलेल्या इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 338 धावांचे तगडं आव्हान दिलं आहे. सलामीवीर जॉनी बेअरस्टोच्या 10 चौकार आणि 6 षटकारांच्या जोरावर यजमान इंग्लंडने 337 धावा ठोकल्या. बेअरस्टोसोबतच जेसन रॉय 66, बेन स्टोक्स 79 आणि जो रुट 44 धावा केल्या. आता भारताला विजयासाठी 338 धावांची गरज आहे.

इंग्लंडच्या बर्मिंगहॅमच्या एजबस्टन मैदानावर आज (30 जून) भारत विरुद्ध इंग्लंड सामना होत आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भारताने विजय शंकर ऐवजी ऋषभ पंतला संधी दिली आहे. त्यामुळे ऋषभ पंतचे यंदाच्या विश्वचषकात पदापर्ण केले.

दरम्यान मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडने भारतीय गोलंदाजांच्या चेंडूवर चांगलीच फटकेबाजी केली. या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी 13 षटकार आणि 27 चौकारांची दमदार खेळी केली. यामुळे टीम इंडियाच्या तोंडचे पाणी पळाले. दरम्यान मागील दोन सामन्यात चार विकेट्स घेणाऱ्या शमीने इंग्लंड विरुद्धच्या सामान्यात आपल्या भेदक गोलंदाजीमुळे 5 विकेट्स घेतले आहे. त्याला कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहने चांगली साथ देत प्रत्येकी 1 विकेट मिळवून दिला. यामुळे यजमान इंग्लंडच्या संघाला 337 धावांपर्यंत रोखण्यात भारताला यश आले.

दरम्यान आज (20 जून) झालेल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर म्हणून मैदानात उतरलेल्या जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय जोडीने पहिल्या विकेट्ससाठी 160 धावांची भागीदारी केली. मात्र कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात असलेल्या रॉयला रविंद्र जाडेजाने झेलबाद केलं. जेसन रॉय 57 चेंडूत 66 धावा करत माघारी परतला. त्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या जॉ रुटने जॉनी बेअरस्टोला चांगली साथ दिली. या दरम्यान जॉन बेअरस्टोने भारतीय गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेत शतकी खेळी केली. त्यामुळे इंग्लंडने सामन्यावर मजबूत पकड मिळवली.

यानंतर मात्र मागील दोन सामन्यात 4 विकेट घेतलेल्या शमीच्या चेडूंवर बेअरस्टो झेलबाद झाला. जॉनी बेअरस्टोने 109 चेंडूत 111 धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेला इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गनला भारतीय गोलंदाजांनी माघारी धाडले. मॉर्गनने अफगाणिस्तान विरुद्ध खेळताना 17 षटकार आणि 4 चौकारांसह 141 धावांचा डोंगर रचला होता. मात्र याच मॉर्गनने आजच्या सामन्यात 9 चेंडूत 1 धाव काढली. त्यामुळे भारताचं या सामन्यात दमदार पुनरागमन केले.

मॉर्गन बाद झाल्याने इंग्लंड चांगलाच कचाट्यात सापडला. त्यानंतर मात्र बेन स्टोक्स आणि जो रुट या दोघांनी अर्धशतकी खेळी करत पुन्हा मॅच इंग्लंडच्या बाजूने वळवली. यानंतर मात्र कर्णधार विराट कोहलीने चेंडू मोहम्मद शमीच्या हाती दिला आणि शमीने हाच विश्वास सार्थकी लावत रुटला माघारी धाडलं. त्यानंतर त्याने जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांना माघारी धाडत इंग्लंडला धक्का दिला. अखेरीस ५० षटकात इंग्लंडला ३३७ धावांपर्यंत रोखण्यात भारत यशस्वी ठरला. भारताकडून मोहम्मद शमीने 5 विकेट्स घेत अर्धा संघ माघारी धाडला. तर कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेत  त्याला चांगली साथ दिली.

विश्वचषकात आज भारताचा सामना यजमान इंग्लंडविरुद्ध होत आहे. इंग्लंडच्या बर्मिंगहॅमच्या एजबस्टन मैदानावर हा सामना खेळवण्यात येत आहे. टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यात विजय मिळवल्यास टीम इंडियाला उपांत्य फेरीचे तिकीट मिळणार आहे. तर या उलट इंग्लंडची अवस्था बिकट आहे. त्यांनी शेवटचे दोन सामने गमवले आहेत. त्यामुळे सेमीफायनलच्या दृष्टीने इंग्लंडसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे.

LIVE UPDATE 

Picture

इंग्लंडचे भारतापुढे 338 धावांचे तगडं आव्हान

30/06/2019,6:53PM
Picture

इंग्लंडला सातवा धक्का

30/06/2019,6:53PM
Picture

इंग्लंडला सहावा धक्का, अवघ्या 7 धावा करत ख्रिस वोक्स बाद

30/06/2019,6:40PM
Picture

इंग्लंडला पाचवा धक्का, बटलर बाद

30/06/2019,6:36PM
Picture

इंग्लंडला चौथा धक्का, जो रुट बाद

30/06/2019,6:20PM
Picture

इंग्लंडला तिसरा धक्का, 17 षटकार ठोकणारा ऑईन मॉर्गन 9 चेंडूत 1 धाव करत माघारी परतला

30/06/2019,5:33PM
Picture

इंग्लंडला मोठा धक्का, जॉनी बेअस्टो 111 धावांवर बाद

30/06/2019,5:20PM
Picture

इंग्लंडला पहिला धक्का, जडेजाच्या अफलातून झेलमुळे रॉय माघारी

30/06/2019,4:44PM

वर्ल्डकप सुरु झाल्यावर इंग्लंड सर्वांचा आवडता संघ होता. इंग्लंडने सुरुवात देखील दमदार केली होती. पहिल्या 5 पैकी 4 सामन्यात त्यांनी विजय मिळवला होता. पण श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन सामन्यात पराभव झाल्यामुळे इंग्लंड अडचणीत आला. त्यामुळे इंग्लंडला उपांत्य फेरीतस्थान निश्चित करण्यासाठी येत्या दोन सामन्यांपैकी किमान एका सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. त्यामुळे आज इंग्लंडची स्थितीही करो या मरो प्रमाणे असणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *