T20 World Cup 2026 : भारताचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बांग्लादेशला ICC कडून मोठा झटका
T20 World Cup 2026 : सध्या भारत आणि बांग्लादेशचे संबंध बिघडले आहेत. त्याचे परिणाम आता क्रिकेटच्या पीचवरही दिसू लागले आहेत. क्रिकेटच्या आडून बांग्लादेश भारताचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करत होता. पण आयसीसीने त्यांना मोठा झटका दिला आहे.

Bangladesh T20 World Cup 2026 : क्रिकेटची सर्वोच्च निर्णय संस्था ICC ने बांग्लादेशची T20 वर्ल्ड कपचा वेन्यू बदलण्याची मागणी धुडकावून लावली आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्ड वेन्यू बदलण्यासाठी ICC कडे वारंवार अपील करत होता. सुरक्षेला धोका असल्याचं त्यांचं कारण होतं. पण रिपोर्ट तपासल्यानंतर ICC ने आपला अंतिम निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आयसीसीने आपल्या तपासात सुरक्षेशी संबंधित जे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते, त्याचा अभ्यास केला. त्यांच्या लक्षात आलं की, टुर्नामेंट दरम्यान कुठल्याही बांग्लादेशी खेळाडूच्या जीवाला धोका नाहीय. T20 वर्ल्ड कप 2026 ची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. बांग्लादेशला आपल्या अभियानाची सुरुवात ओपनिंग डे च्या दिवशीच करायची आहे.
ICC च्या या स्टँडमुळे बांग्लादेशी क्रीडा मंत्रालयाचे सल्लागार आसिफ नजरुल यांचा दावा खोडून निघाला आहे. ते म्हणालेले की, मुस्तफिजुर रहमानचा टीममध्ये समावेश केल्यास धोका वाढू शकतो. आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त सुरक्षा एक्सटपर्ट्सच्या टीमने हा अभ्यास करुन बांग्लादेशी टीमला भारतात सामने खेळण्यापासून कुठलाही धोका नसल्याचा निष्कर्ष काढला.
ICC शी संबंधित सूत्रांनी काय सांगितलं?
ICC शी संबंधित सूत्रांचं म्हणणं आहे की, भारतात प्रत्येक पातळीवर सुरक्षेचे निकष परखण्यात आले आहेत. कुठल्याही क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यायोग्य स्थिती आहे. भारतात कुठल्याही शहरात किंवा वेन्यूवर कुठलाही बांग्लादेशी खेळाडू, अधिकारी यांच्या जीवाला धोका जाणवला नाही. शेड्यूल नुसार बांग्लादेशला आपले सामने कोलकाता आणि मुंबईमध्ये खेळायचे आहेत. बांग्लादेशी क्रीडा मंत्रालयाचे सल्लागार आसिफ नजरुल यांनी स्टेटमेंट केलं होतं की, आयसीसीच्या रिपोर्टमध्ये मुस्तफिजुरला भारतात धोका असल्याचे संकेत आहेत.
अधिकृत प्रतिक्रियेची अपेक्षा
त्यानंतर बांग्लादेशी क्रिकेट बोर्डाने त्यावर स्पष्टीकरण दिलं. आसिफ नजरुलने त्याच्या वक्तव्यावरुन माघार घेतली. T20 वर्ल्ड कपच्या सामन्यांचं ठिकाण बदलण्याच्या मागणीवर बांग्लादेशला आता ICC च्या अधिकृत प्रतिक्रियेची अपेक्षा आहे. ठरलेल्या शेड्युलमध्ये कुठलाही बदल होणार नाही, अंस ICC शी संबंधित सूत्रांचं म्हणणं आहे.
