AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC world cup song 2019 : वर्ल्ड कपसाठी आयसीसीकडून गाणं रिलीज

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने शुक्रवारी वर्ल्ड कप 2019 साठीचं अधिकृत गाणं रिलीज केलं. स्टँड बाय असं या गाण्याचं नाव आहे. येत्या 30 मे पासून क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होत आहे. त्यादरम्यान जगभरात ठिकठिकाणी हे गाणं ऐकवलं जाईल. स्टँड बाय हे गाणं लॉरेन आणि ब्रिटनचा सर्वात प्रभावी रुडिमेंटल बँडने तयार केलं आहे. ICYMI: The […]

ICC world cup song 2019 : वर्ल्ड कपसाठी आयसीसीकडून गाणं रिलीज
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM
Share

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने शुक्रवारी वर्ल्ड कप 2019 साठीचं अधिकृत गाणं रिलीज केलं. स्टँड बाय असं या गाण्याचं नाव आहे. येत्या 30 मे पासून क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होत आहे. त्यादरम्यान जगभरात ठिकठिकाणी हे गाणं ऐकवलं जाईल. स्टँड बाय हे गाणं लॉरेन आणि ब्रिटनचा सर्वात प्रभावी रुडिमेंटल बँडने तयार केलं आहे.

यूट्यूबवर लाखो लोकांची पसंती

आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हे गाणं शेअर केलं आहे. शुक्रवारी जारी करण्यात आलेलं हे गाणं ट्विटवर अनेकांनी रिट्विट केलं आहे. मात्र यूट्यूबवर दीड लाखांपेक्षा अधिक लोकांनी हे गाणं पाहिलं आहे.

एकदिवसीय विश्वचषकाला (ICC Cricket World Cup 2019)  30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर 16 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे.

दरम्यान, यंदापासून वर्ल्डकपमध्ये एक टीम सर्व संघांसोबत सामने खेळणार आहे. या फेरीनंतर पहिले चार संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. अंतिम सामना 14 जुलैला खेळवण्यात येईल.

1983 आणि 2011 चा विश्वचषक जिंकलेल्या टीम इंडियात कोणत्या 15 खेळाडूंना स्थान मिळणार याबाबत उत्सुकता आहे. भारतीय संघातील बहुतेक खेळाडूंची नावं निश्चित झाली आहेत, मात्र चौथ्या क्रमांकावर कोण याबाबत संघव्यवस्थापनाला डोकेदुखी आहे.

विश्वचषकासाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, यजुवेंद्र चहल,  कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या,  रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी

संबंधित बातम्या 

कोणाची कॉमेंट्री आवडेल? वर्ल्डकपसाठी समालोचकांची यादी जाहीर  

ICC World Cup 2019 LIVE : वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर, रायुडू, पंत बाहेर   

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...