ICC Womens T20 World Cup Final : सलग 5 व्यांदा ऑस्ट्रेलिया विश्वविजेता, भारताचा दारुण पराभव

| Updated on: Mar 08, 2020 | 6:27 PM

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विजेतपदाची लढत सुरु आहे. या अंतिम सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले (ICC Womens T20 World Cup final) आहे.

ICC Womens T20 World Cup Final : सलग 5 व्यांदा ऑस्ट्रेलिया विश्वविजेता, भारताचा दारुण पराभव
Follow us on

मेलबर्न : आयसीसी महिला टी 20 विश्वचषक 2020 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव (ICC Womens T20 World Cup final) केला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 184 धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 99 धावांत गारद झाला. शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, जेमायमा रॉड्रीग्ज या भारतीय फलंदाजांनी अक्षरश: विकेट फेकल्या. त्यामुळे टीम इंडियाला 85 धावांनी हार पत्कारावी लागली. ऑस्ट्रेलियाने सलग पाचव्यांदा टी-20 विश्वविजेतेपद पटकावले.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात (ICC Womens T20 World Cup final) नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मूनी आणि एलिसा हेली यांच्या धडाकेबाजी फलदांजीमुळे भारताला 185 धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी अतिशय खराब कामगिरी केली. भारताकडून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी सलामीवीर शफाली वर्मा ही अंतिम सामन्यात अयशस्वी ठरली.

सलामीवीर शफाली वर्मा ही अवघ्या 2 धावा करुन बाद झाली. त्यानंतर दुखापतग्रस्त तानिया भाटीयाच्या जागी मैदानावर आलेली जेमायमा रॉड्रीग्ज शून्यावर माघारी परतली. यानंतर स्मृती मानधना, कर्णधार हरमनप्रीत कौर या ही काही फरकाने आऊट झाल्या. टीम इंडियाकडून एकट्या दिप्ती शर्माने 33 धावा केल्या. मात्र भारताचे इतर 6 फलंदाज अवघ्या एक आकडी धावसंख्या करत बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शूटने सर्वाधिक 4  विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मूनी आणि एलिसा हेली यांनी धडाकेबाज सुरुवात करत अवघ्या 5 षटकात 47 धावा केल्या. तर एलिसा हेली 30 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. पण त्यानंतर ती झेलबाद झाली. तिने 39 चेंडूत 5 षटकारांसह 75 धावा केल्या.

त्यानंतर सलग तीन सामन्यांत चांगली कामगिरी करणाऱ्या सलामीवीर बेथ मूनीने या सामन्यात संयमी अर्धशतक केले. तुफान फटकेबाजी सुरू असताना टीम इंडियाकडून दिप्ती शर्माने एकाच षटकात दोन बळी घेतले.

कर्णधार मेग लॅनिंग 16 धावांवर बाद झाल्यानंतर गार्डनरही २ धावात माघारी परतली. पण बेथ मूनीच्या नाबाद 78 धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने 184 धावांचा टप्पा गाठला.  ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये हा सामना झाला.

टीम इंडियासाठी खास दिवस

2018 मधील टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. यंदाच्या स्पर्धेत साखळी फेरीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला चुरशीच्या सामन्यात मात दिली होती. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतरही आधीच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघ फायनल दाखल झाला होता.

ICC Womens T20 World Cup : फायनलमध्ये पाऊस पडला तर विजेता कोण?

विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या महिला टीमचा इतिहास सर्वांना माहित आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत 19 सामने झाले आहेत. यात भारतीय संघ 6 वेळा विजयी झाला आहे. तर ऑस्ट्रेलिया 13 सामन्यात विजयी झाला आहे.

तर टी-20 विश्वचषक सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 4 सामने झाले आहेत. त्यात 2 सामने भारताने जिंकले आहेत. तर दोन सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी झाला आहे. त्यामुळे या सामन्यातील विजय टीम इंडियासाठी फार खास असणार आहे.

भारतीय संघाचा आतापर्यंतचा प्रवास

भारतीय महिला संघाने आतापर्यंत एकाही विश्वचषकावर नाव कोरलेले नाही. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाने विश्वचषकात जबरदस्त कामगिरी केली. मात्र, यंदाचा विश्वचषक भारताच्या थोडक्यात निसटला. भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांचा पराभव करत इथवर मजल मारली. विशेष म्हणजे भारताने विश्वचषक स्पर्धेत एकही सामना गमावलेला (ICC Womens T20 World Cup final) नाही.