WORLD CUP : महामुकाबला! भारत आणि पाकिस्तान आज मॅँचेस्टरमध्ये आमने-सामने

भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा विश्वचषकातील सामना आज 16 जून रोजी होत आहे. क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलेल्या या सामन्यात कोण बाजी मारणार याचीच चर्चा जगभरात सुरु आहे.

WORLD CUP : महामुकाबला! भारत आणि पाकिस्तान आज मॅँचेस्टरमध्ये आमने-सामने
Follow us
| Updated on: Jun 16, 2019 | 8:19 AM

India vs Pakistan मँचेस्टर (इंग्लंड) : भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा विश्वचषकातील सामना आज 16 जून रोजी होत आहे.  इंग्लंडमधील मँचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात (old trafford stadium) हा सामना होणार आहे. अवघ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलेल्या या सामन्यात कोण बाजी मारणार याचीच चर्चा जगभरात सुरु आहे.

भारताने विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांना हरवून झोकात सुरुवात केली आहे. भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना पावसाने रद्द झाला. त्यानंतर आता भारत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी मुकाबला करण्यास सज्ज आहे. दुसरीकडे पाकिस्तानने विश्वचषकात चार सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ एका सामन्यात विजय झाला आहे तर दोन सामन्यात पराभव झाला. एक सामना रद्द झाला. त्यामुळे आजच्या सामन्यात विराट कोहलीची टीम इंडिया विश्वचषकातील आपला विक्रम कायम ठेवणार की सरफराज अहमदची पाकिस्तानी टीम बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

विश्वचषकाचा इतिहास

कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाकिस्तानमध्ये विश्वचषकात आतापर्यंत 6 वेळा सामने रंगले. भलेही पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यात भारताला अनेकवेळा हरवलं असलं, तरी भारताने विश्वचषकात नेहमीच पाकिस्तानला धूळ चारली आहे. भारत-पाकिस्तानमध्ये 131 आंतरराष्ट्रीय वन डे सामने झाले. यापैकी 73 सामने पाकिस्तानने तर 54 सामने भारताने जिंकले, 4 सामने अनिर्णित राहिले. मात्र विश्वचषकातील 6 पैकी 6 सामन्यात भारताने विजय मिळवला.

या विश्वचषकात भारताचे आतापर्यंत तीन सामने झाले आहेत, ज्यापैकी दोन सामन्यात विजय मिळवला, तर तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. भारतीय संघ 5 गुणांसह 10 संघांच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानने चार सामने खेळले असून दोन पराभवांचा सामना करावा लागलाय. पाकिस्तानचाही एक सामना रद्द झाला होता. त्यामुळे पाकिस्तान 3 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे.

भारतासाठी ओल्ड ट्रॅफोर्ड मैदान ‘लकी’?

दरम्यान मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात 1999 च्या विश्वचषकादरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान हा पहिला सामना खेळवण्यात आला होता. हा सामना 8 रोजी झाला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी टीम इंडियाने 50 षटकांत 227 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान 180 धावांत गारद झाला. त्यामुळे भारताने 47 धावांनी हा सामना जिंकला. या  सामन्यात टीम इंडियाचा फिरकीपटू वेंकटेश प्रसादने 5 बळी घेतले. तर द्रविड आणि अझहरुद्दीने अर्धशतकी खेळी केली. ज्यामुळे टीम इंडियाने विजय मिळवला. त्यामुळे टीम इंडियासाठी हे मैदान लकी मानलं जातं.

महामुकाबलापूर्वी भारताला झटका

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे तीन आठवड्यांसाठी कोणतेही सामने खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खणखणीत शतक झळकावणाऱ्या धवनच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे धवन तीन आठवड्यांसाठी संघाबाहेर पडला आहे. यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात टीम इंडियाला शिखर धवनची उणीव नक्कीच भासणार आहे.

पाकिस्तान एकदाच विश्वविजेता

विश्वचषकात पाकिस्तानला आतापर्यंत एकदाही भारताविरुद्ध जिंकता आलेलं नाही. भारताने आतापर्यंत दोन वेळा 1983 आणि 2011 मध्ये विश्वचषक जिंकला आहे, तर पाकिस्तानने इम्रान खानच्या नेतृत्त्वात 1992 मध्ये विश्वविजेता होण्याचा मान मिळवला होता.

तिकिटांच्या किमती गगनाला

विश्वचषकातील मच अवेटेड भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. एका तिकिटाची किंमत 60 हजार रुपयांपर्यंत गेली आहे. 2013 नंतर भारत आणि पाकिस्तान यांचा सामना फक्त आयसीसी आणि आशिया क्रिकेटच्या मालिकांमध्येच होतो. ब्रिटेनमध्ये लाखोंच्या संख्येने भारतीय आणि पाकिस्तानी वंशाचे लोक राहतात. त्यामुळे या महामुकाबल्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली आहे. 20 हजार क्षमता असलेल्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानाची खिडकी उघडताच सर्व तिकिटांची विक्री झाली. पण ज्यांनी तिकिटं घेतली आहेत, ते लोक यातून मोठा नफा कमावत आहेत.

सामन्यावर पावसाचे सावट

16 जूनला, रविवारी म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या दिवशी दुपारी हलकासा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मँचेस्टरमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 ते दुपारी 1 वाजेपर्यंत पावसाचा अंदाज आहे. स्थानिक वेळेनुसार मँचेस्टरमध्ये सामना सकाळी 10.30 वाजता सुरु होईल, त्यामुळे सामन्याच्या सुरुवातीला काहीच अडथळा येणार नसल्याचे दिसते आहे. मात्र सामना मध्यावर आल्यानंतर पावसाचा व्यत्यय येऊ शकतो.

पावसाच्या व्यत्ययामुळे वर्ल्डकपमधील सामने रद्द होत असल्याने, क्रिकेट रसिकांनी आयसीसीवर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग केलं गेलं.

संबंधित बातम्या 

World Cup : भारत-पाकिस्तान सामनाही पावसात वाहून जाणार?

India vs Pakistan : मॅच पाहण्यासाठी मुलाला घेऊन सानिया स्टेडियममध्ये, भारत-पाक सामन्यात कुणाला पाठिंबा?

जबरा पाकिस्तानी फॅन, ज्याला धोनी 8 वर्षांपासून तिकीट पाठवतो!

India vs Pakistan : मोहम्मद आमीरवर हल्ला चढवा, सचिनचा विराट-रोहितला सल्ला

भारत-पाक सामना, एका तिकिटाची किंमत तब्बल 60 हजारांच्याही पुढे

हॉटेलमध्ये सुविधा नाही, प्रायव्हेट जिममध्ये वर्कआऊट, भारतीय संघाची मजबुरी

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.