AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : 4 वर्षांपूर्वी आणि आत्ताही इंग्लंड दौऱ्यासाठी संघात स्थान, पण अजूनपर्यंत प्लेइंग XI मध्ये संधी नाही, कोण आहे तो दुर्देवी ओपनर?

ENG vs IND : भारतीय संघातील एक ओपनर खूप निराश झाला. 2021-22 साली पहिल्यांदा टीम इंडियात निवड झाली होती. पण अजूनपर्यंत एकदाही त्याची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झालेली नाही. आपल्याकडे दुर्लक्ष झाल्याच दु:ख त्याने वडिलांना फोनवरुन सांगितलं. याचा खुलासा स्वत: त्याच्या वडिलांनी केलाय. कोण आहे हा दुर्देवी खेळाडू?. त्याच्यानंतर आलेल्या 15 खेळाडूंनी टीम इंडियातून डेब्यू केलाय.

ENG vs IND : 4 वर्षांपूर्वी आणि आत्ताही इंग्लंड दौऱ्यासाठी संघात स्थान, पण अजूनपर्यंत प्लेइंग XI मध्ये संधी नाही, कोण आहे तो दुर्देवी ओपनर?
Team India Image Credit source: PTI
| Updated on: Aug 08, 2025 | 11:23 AM
Share

इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांच्या सीरीजमध्ये अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाच्या खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केलं. पाच कसोटी सामन्यांची ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. या सीरीजमध्ये असे काही खेळाडू होते, ज्यांना या दौऱ्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. ते पूर्णवेळ बेंचवरच बसून होते. भारतीय संघातील एक ओपनर खूप निराश झाला. आपल्याकडे दुर्लक्ष झाल्याच दु:ख त्याने वडिलांना फोनवरुन सांगितलं. याचा खुलासा स्वत: त्याच्या वडिलांनी केलाय. आता स्वत: हेड कोच गौतम गंभीर यांनी त्या खेळाडूला आश्वासन दिलय. त्यामुळे लवकरच सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनची 4 वर्षापासूनची प्रतिक्षा संपू शकते.

पाचव्या कसोटी सामन्यात आपल्याला खेळण्याची संधी मिळेल असा अभिमन्यू ईश्वरनला पूर्ण विश्वास होता. पण, जेव्हा त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही, तेव्हा तो निराश झाला. याचा खुलासा अभिमन्यूचे वडिल रंगनाथन परमेश्वरन यांनी केला. विक्की लालवानीच्या यूट्यूब चॅनलवरील मुलाखतीत ते या बद्दल बोलले. ईश्वरनने मला फोन करुन सांगितलं की, पप्पा मला अजूनही जागा मिळालेली नाही. अभिमन्यू ईश्वरनने इंडिया-ए टीमकडून खेळताना इंग्लंडमध्ये खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं. मात्र, तरीही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली नाही. त्याला वर्ष 2021-22 मध्ये पहिल्यांदा भारतीय संघात स्थान मिळालं होतं. पण अजूनपर्यंत तो डेब्यू मॅच खेळू शकलेला नाही. ईश्वरनच्या वडिलांनी सांगितलं की, टीमचे कोच गौतम गंभीर यांनी त्याला विश्वास दिला आहे.

‘तुला संधी नक्की मिळेल’

शेवटच्या कसोटी सामन्यातही संधी न मिळाल्याने सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन खूप निराश होता. वडिल परमेश्वरन ईश्वरन यांनी सांगितलं की, “कोच गौतम गंभीर स्वत: मुलाशी बोलले. त्यांनी अभिमन्यूला विश्वास दिला. ते म्हणाले की, तुझं बरोबर चाललं आहे. तुला संधी नक्की मिळेल. तू दीर्घकाळ टीम इंडियासाठी खेळशील”

तुला तुझा हक्क जरुर मिळेल

“मी तो नाही, जो एक-दोन कसोटी सामन्यानंतर तुला टीम बाहेर करणार. मी तुला भरपूर संधी देईन” असं गौतम गंभीरने सांगितलय. “संपूर्ण कोचिंग स्टाफने त्याला विश्वास दिला की, तुला तुझा हक्क जरुर मिळेल” असं अभिमन्यूचे वडिल म्हणाले. परमेश्वरन ईश्वरन म्हणाले की, ‘मागच्या चार वर्षांपासून माझा मुलगा देशाकडून खेळण्याची प्रतिक्षा करत आहे’ त्याने 23 वर्ष भरपूर मेहनत केलीय. इंग्लंडवरुन परतल्यानंतर अभिमन्यूने दुलीप ट्रॉफीची तयारी सुरु केलीय.

प्रथम श्रेणीमध्ये किती हजार धावा

अभिमन्यु ईश्वरनचे वडिल म्हणाले की, त्यांचा मुलगा दुलीप ट्रॉफीच्या तयारीसाठी बंगळुरुला जाणार आहे. तो तिथे 10-12 दिवस राहिलं. काही दिवसांसाठी डेहराडूनला जाईल. अभिमन्यू ईश्वरनची 2021-22 साली पहिल्यांदा टीम इंडियात निवड झाली होती. पण त्याला अजूनपर्यंत प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. त्याच्यानंतर 15 खेळाडूंनी टेस्ट डेब्यु केलाय. अभिमन्यू ईश्वरनने 103 प्रथम श्रेणी सामन्यात 48.70 च्या सरासरीने 7841 धावा केल्या आहेत.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा