AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS 3rd Test : केएल राहुलच्या जागेसाठी दोन दावेदार, रोहित शर्मा करणार ‘या’ खेळाडूची निवड!

फॉर्म गमवलेल्या केएल राहुलला तिसऱ्या कसोटी डावललं जाण्याची दाट शक्यता आहे. केएल राहुल दोन कसोटी सामन्याती तीन डाव मिळून फक्त 35 धावाच करू शकला आहे.

IND vs AUS 3rd Test : केएल राहुलच्या जागेसाठी दोन दावेदार, रोहित शर्मा करणार 'या' खेळाडूची निवड!
जागा 1 दावेदार 2, रोहित शर्मा केएल राहुल याच्या जागी टीममध्ये कुणाला खेळवणार?Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 25, 2023 | 8:50 PM
Share

मुंबई : बॉर्डर गावसकर मालिकेतील दोन सामने गमवल्यानंतर ऑस्ट्रेलियनं संघ तिसऱ्या कसोटीसाठी सज्ज झाला आहे.तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून इंदौर येथे खेळला जाणार आहे. दुसरीकडे फॉर्म गमवलेल्या केएल राहुलला तिसऱ्या कसोटी डावललं जाण्याची दाट शक्यता आहे. केएल राहुल दोन कसोटी सामन्याती तीन डाव मिळून फक्त 35 धावाच करू शकला आहे. त्यामुळे त्याचं उपकर्णधारपदही काढून घेतलं आहे. अशात त्याला तिसऱ्या कसोटीत संधी मिळणं कठीण झालं आहे.पण कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविडने दुसऱ्या कसोटीनंतर केएल राहुलला पाठिंबा दिला होता. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. पण त्याला टीम मॅनेजमेंटने बाहेर बसवलं तर रोहित शर्मासोबत ओपनिंगाल शुभमन गिल येण्याची शक्यता आहे. पण सूर्यकुमार यादव यालाही संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सूर्यकुमार यादवला केएल राहुलच्या जागी संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ओपनिंगला चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीलाही पाठवलं जाऊ शकतं.

शुभमन गिलला संधी मिळण्याची दाट शक्यता

शुभमन गिल सध्या सर्वोच्च फॉर्मात आहे. मागच्या पाच आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने दोन शतकं ठोकली आहेत. वनडे आणि टी 20 मध्ये प्रत्येकी एक शतक केलं आहे. न्यूझीलँडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 208 धावांची खेळी केली होती. त्यामुळे प्लेईंग 11 मध्ये शुभमन गिलला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

पहिला कसोटी सामना

पहिल्या कसोटी सामना 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान होता. मात्र तिसऱ्या दिवशीच या सामन्याचा निकाल लागला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली आणि 177 या धावसंख्येवर सर्वबाद झाली. त्यानंतर भारताने सर्वबाद 400 धावा केल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन संघ 91 धावांवर सर्वबाद झाला. भारताचा एक डाव आणि 132 धावांनी विजय झाला. या सामन्यात केएल राहुलने 20 धावा केल्या होत्या.

दुसरा कसोटी सामना

दुसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी घेतली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 263 धावा केल्या. त्या प्रत्युत्तर भारताने सर्वबाद 262 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने एका धावेच्या आघाडीसह 118 धावा केल्या आणि विजयासाठी 119 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारताने चार गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यातील पहिल्या डावात केएल राहुलनं 17 धावा आणि दुसऱ्या डावात केवल 1 धाव करून बाद झाला.

इंदौर कसोटीसाठी भारताची संभावित प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल/शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर , सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.