AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Aus 3rd Test | रविंद्र जाडेजाचा अफलातून ‘थ्रो’, स्मिथ तंबूत; सोशल मीडिया ‘जाडेजामय’!

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जाडेजाने अचूक थ्रो मारत शतकवीर स्टीव्र स्मिथला तंबूत जायला भाग पाडलं.

Ind vs Aus 3rd Test | रविंद्र जाडेजाचा अफलातून 'थ्रो', स्मिथ तंबूत; सोशल मीडिया 'जाडेजामय'!
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Jan 08, 2021 | 3:13 PM
Share

सिडनी : सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात सर रविंद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) अचूक थ्रो मारत शतकवीर स्टीव्र स्मिथला (Steve Smith) तंबूत जायला भाग पाडलं. त्याच्या थ्रो एवढा रॉकेट होता की स्मिथला काही कळायच्या आतमध्ये जाडेजाचा बॉल स्टम्पवर आदळला देखील होता. जाडेजाच्या या थ्रो वर टीम इंडियाचे चाहते फिदा झाले आहेत. सोशल मीडियावर जाडेजाची वाहवा सुरु आहे. (Ind vs Aus Ravindra Jadeja Superhit Throw Indian Fans Happy on Social Media)

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सामन्यातील 106 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर स्मिथने फटका मारला. स्मिथने पहिली धावा पूर्ण केली. मात्र तो दुसऱ्या धावेसाठी आग्रही होता. स्मिथ दुसऱ्या धावेसाठी स्ट्राईक एंडच्या दिशेने पळाला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला जाडेजा होता. जाडेजाने स्मिथला दुसरी धावा घेताना पाहिलं. जाडेजाने थेट रॉकेट थ्रो केला. जाडेजाचा थ्रो परफेक्ट स्टम्पवर लागला. अशा प्रकारे स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आला. जाडेजाच्या या थ्रोचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात येत आहे.

रविंद्र जाडेजाची तारीफ करणारे काही ट्विट्स

जाडेजाने फिल्डिंगसह गोलंदाजीमध्येही चमकदार कामगिरी केली. जाडेजाने कांगारुंना आपल्या फिरकीवर नाचवलं. जाडेजाने 18 ओव्हर बोलिंग केली. यापैकी 3 ओव्हर या मेडने टाकल्या. जाडेजाने 65 धावा देत महत्वपूर्ण 4 विकेट्स घेतल्या. जाडेजाने मार्नस लाबुशेन, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स आणि नॅथन लायल या फलंदाजांना आऊट केलं.

दरम्यान, सामन्यातील दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून फिरकीपटू रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind 3rd Test | जोरदार जाडेजा, दमदार सैनी, बुम बुम बुमराह, गोलंदाजांनी कांगारुंना तंगवलं

ऑस्ट्रेलियाचा नवा ‘ग्लेन मॅक्ग्रा’, पदार्पणातच ज्याने वडिलांच्या मित्रांना लखपती बनवलं!

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?