हार्दिक पांड्याचा टीम इंडिया आणि कर्णधार कोहलीला मोठा धक्का, म्हणाला, ‘दुसरा ऑलराऊंडर शोधा’

संघात ‘दुसरा ऑलराऊंडर शोधा’, अशा स्पष्ट शब्दात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने निवड समितीला आणि कर्णधार कोहलीला सांगितलं आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:25 AM, 28 Nov 2020

सिडनीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) यांच्यात पार पडलेल्या सिडनीच्या मैदानावर (Sydney Cricket Ground) भारताचा 66 धावांनी पराभव झाला. त्यानंतर भारतीय संघाला अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने भारतीय संघाला पर्यायाने कर्णधार विराट कोहलीला मोठा धक्का दिलाय. संघात ‘दुसरा ऑलराऊंडर शोधा’, अशा स्पष्ट शब्दात हार्दिक पांड्याने निवड समितीला आणि कर्णधार कोहलीला सांगितलं आहे. (Ind vs Aus When Bowl When time is right But we need To Groom other All Rounders Says hardik Pandya)

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्याच्या बोलिंगची कमी भारतीय संघाला मोठ्या प्रकर्षाने जाणवली. मागील वर्षापासून पाठीच्या आजारामुळे हार्दिक बोलिंग करु शकत नाही. संपूर्ण आयपीएलच्या हंगामात त्याने मुंबईकडून केवळ बॅटिंग केली. सध्या तो त्याच्या बोलिंग अ‌ॅक्शनवर तसंच बोलिंग स्पीडवर काम करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात हार्दिकच्या बोलिंगची उणीव भासल्याचं स्वत: कर्णधार कोहलीने मान्य केलं. अशातच बोलिंगचा सहाव्या पर्यायासाठी भारतीय संघाने दुसऱ्या ऑलराऊंडरचा शोध घेणे आवश्यक आहे, असं हार्दिक पांड्या म्हणाला.

भारतीय संघाला असा खेळाडू हवा जो भारतीय संघाकडून खेळलेला आहे. पाच बोलर्सला घेऊन खेळणे मुश्किल असू शकतं कारण जर कोणत्याही एका बोलर्सचा दिवस खराब असेल तर त्याच्या ओव्हर्स भरून काढणारं दुसरं कुणीही नसतं. अशा परिस्थितीत संघाला असा पर्याय कोण देऊ शकतं, असा प्रश्न हार्दिकला विचारल्यावर त्याने त्याचा भाऊ क्रुणालचं नाव घेतलं. हार्दिक म्हणाला, “निवड समितीने क्रुणालच्या नावाचा समावेश करायला हरकत नाही. भारतीय संघाकडे दुसरे पर्याय असतील तर त्यांचाही त्यांनी विचार करायला हवा. पण नसतील तर क्रुणालचा पर्याय आहे”.

टी ट्वेन्टी वर्ल्ड कपबद्दल आतापासून विचार

भारताला यापुढची मोठी टूर्नामेंट आयसीसी टी ट्वेन्टी वर्ल्ड कपच्या रुपात पुढच्या 10 महिन्यांनी खेळायची आहे. त्यादृष्टीने आतापासून माझा विचार सुरु आहे. मोठ्या टूर्नामेंटमध्ये माझं बॅटिंग आणि बोलिंगमध्ये कश्या पद्धतीने चांगलं प्रदर्शन होऊ शकतं, या दृष्टीने माझी तयारी सुरु असल्याचं हार्दिकने सांगितलं.

बाबा झाल्यापासून आयुष्य बदललं

बाबा झाल्यापासून मी पहिल्यापेक्षा आता शांत झालो आहे. पहिल्यापेक्षा आता माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. तसंच माझ्यात आता कुटुंबवत्सलपणा वाढला आहे. सप्टेंबरमध्ये हार्दिक बाबा झाला आहे. तेव्हापासून तो घरापासून दूर आहे. आयपीएलचा हंगाम आणि आता ऑस्ट्रेलिया दौरा यामुळे तो त्याच्या घरी जाऊ शकलेला नाही.

(Ind vs Aus When Bowl When time is right But we need To Groom other All Rounders Says hardik Pandya)

संबंधित बातम्या

IND vs AUS : इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धचा प्रत्येक सामना हरणार; सांगितलं कारण

India vs Australia 1st ODI Live Score update : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची कमाल, भारताचा 66 धावांनी पराभव